• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गर्भवती इन्फ्लुएन्सरला जिवंत जाळण्याच प्रयत्न, 54 दिवसांनंतर मृत्यू! लिव्ह इन पार्टनरनेच रचला भयंकर कट

August 30, 2026 by admin Leave a Comment


संपूर्ण देशाला हादरुन टाकले असे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरला तिच्या लिव्ह-इन पार्टनरनेच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही इन्फ्लूएन्सर सात आठवड्यांची गर्भवती होती. ही इन्फ्लूएन्सर जीवन मृत्यूशी झुंज देत होती. तिचे संपूर्ण शरीर जळाले होते. पण शनिवारी चंदीगढ येथील रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. आता नेमकं प्रकरण काय होतं? जाणून घ्या..

सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर मनजीत कौरचा 54 दिवसांच्या संघर्षानंतर शनिवारी चंदीगडच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तिच्या लिव्ह-इन पार्टनर आणि एका अन्य सहकाऱ्याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मृत मनजीत कौर ७ आठवड्यांची गर्भवती होती. याशिवाय तिला एक सात वर्षांचा मुलगा आहे, जो पूर्व पतीसोबत राहतो. मनजीत कौरचा पतीसोबत घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर ती लिव्ह-इन पार्टनरसोबतच लिव्ह-इनमध्ये राहत होती.

लिव्ह-इन पार्टनरने रचला कट

चंदीगड पोलिस दोन्ही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींची नावे शुभी आणि पिंडा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ३ जुलैची आहे. दोन्ही आरोपींनी मनजीतला एका दारूच्या दुकानानजीक बोलावले होते. त्यानंतर दोघांनी जबरदस्तीने मनजीतला कारमध्ये बसवले आणि मोरिंडा येथे नेले. तिथे सुनसान भागात त्यांनी मनजीतला एका झाडाला बांधले आणि मारहाण केली. त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आगीचा लोट वाढू लागला होता तेवढ्यात मनजीतच्या एका मैत्रिणीने पाहिले. तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मोरिंडाच्या रुग्णालयातून मनजीतला मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. काही दिवसांनंतर त्यांना पीजीआयला रेफर करण्यात आले. खरड सदर ठाण्याचे एसएचओ गुरप्रीत सिंह यांनी सांगितले की, मनजीत कौर अतिशय गंभीररीत्या जळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची टीम रुग्णालयात पोहोचली आणि मनजीतच्या आईशी बोलली होती. मनजीतचे कुटुंब सेक्टर ३४मध्ये राहत होते. त्यांनी सांगितले की, कुटुंबाच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विविधेतील एकता हाच भारताच आत्मा, सरसंघचालक मोहन भागवतांचा अमेरिकेतून संदेश, धर्माबाबत मोठे चिंतन
  • Petrol Diesel Price Today : 115 रूपये पेट्रोल, 104 डिझेल, तेलाच्या किमतीत मोठे बदल..
  • शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
  • 9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
  • किचनमध्ये जाताच राग येतोय, चिडचीड होतेय? वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in