• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गरजेचं आहे की पैशांचा अपव्यय? ‘अँटी रस्ट कोटिंग’वर पैसे खर्च करण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा!

September 3, 2026 by admin Leave a Comment


नवी कार खरेदी केली की तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं. गाडीवर एक साधा रेघोटा जरी आला तरी जीव वर खाली होतो. इतकंच काय तर गाडीच्या प्रत्येक पार्ट्सची तितकीच काळजी घेतली जाते. गाडीच्या खालचा पत्रा सडू नये म्हणून अँटी रस्ट कोटिंगही केली जाते. नवी कार खरेदी केल्यानंतर डिलरशिप किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी जाताच अँटी रस्ट कोटिंचा सल्ला सहज दिला जातो. पण नव्या गाडीला खरंच अँटी रस्ट कोटिंग करणं गरजेचं आहे का? कारण नव्या गाड्यांना कंपनीकडून अधिच अँटी रस्ट कोटिंग केलेलं असतं. त्यामुळे अँटी रस्ट कोटिंग करण्याची गरज भासत नाही. सामान्य आणि सुकं असलेल्या भागात राहणाऱ्यांनी अतिरिक्त कोटिंग करण्याची तशी गरज नाही. पण समुद्राच्या आसपास आणि पाणी साचत असलेल्या ठिकाणी राहणाऱ्यांनी अँटी रस्ट कोटिंग करणं भाग आहे.

अँटी रस्ट कोटिंग नेमकं काय असते?

अँटी रस्ट कोटिंगमुळे चेसिस आणि अंडरबॉडी सुरक्षित राहावी यासाठी एक परत लावली जाते. यामुळे गाडीचा हा भाग पाणी, दमट वातावरण, कचरा यापासून वाचण्यास मदत होते. अँटी रस्ट परत असल्यास गंज लागण्याची शक्यता कमी असते. पण आधुनिक कारमध्ये अंडरबॉडीवर गॅल्वनाइज्ड स्टील आणि फॅक्ट्री फिटेड अँटी रस्ट सुरक्षा असते. त्यामुळे नव्या कारला अतिरिक्त कोटिंग केलं नाही तर पाच ते दहा वर्षे आरामात गंजरहित राहू शकते. जर तुम्ही चेन्नई, गोवा किंवा मुंबईत राहात असाल आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत असेल तर अँटी रस्ट कोटिंग असणं आवश्यक पडू शकते.

तुमची गाडी पाच ते सहा वर्षे जुनी झाली असेल आणि कंपनीकडून कोटिंग घासली असेल, तर अँटी रस्ट कोटिंग करणं गरजेचं आहे. पण तुम्ही सुकं आणि सामान्य वातावरण भागात राहात असाल तर नव्या गाडीला तात्काळ अँटी रस्ट कोटिंग करणं तसं गरजेचं नाही. त्यामुळे पैशांचा अपव्यय होऊ शकतो.

अँटी रस्ट कोटिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे गाडी धुवून सुकवणं. जर गाडी न धुताच किंवा धुतल्यानंतर न सुकवताच त्यावर कोटिंग केल्यास ओलावा राहिल. यामुळे गंज लागण्याची प्रक्रिया आणखी वेगाने होऊ शकते. म्हणून अॅटी रस्ट कोटिंग करण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Success Story: सेरेब्रल पाल्सीवर मात करत मिळवला IIT मद्रासमध्ये प्रवेश; वाचा रिक्षाचालकाच्या मुलाची प्रेरणादायी कथा!
  • तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा विसर्ग
  • Akshay: हिरोची इमेज सोडून खलनायकाच्या भूमिकेत अक्षय कुमार; ‘हैवान’च्या भूमिकेबद्दल केला मोठा खुलासा
  • Salman Khan : सलमानच्या पुतण्याची बॉलिवूडमध्ये होणार एंट्री ! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत..
  • या लोकांच्या घरात स्वत:हून धावून येते लक्ष्मी, घरात कधीच पैशांची पडत नाही कमतरता, कोण आहेत ते तीन लोक?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in