• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गणपती असो किंवा दुसरा कोणताही सण, शॉपिंगसाठी मुंबईकरांना हा मार्केटच वाटतो बेस्ट

September 6, 2026 by admin Leave a Comment


गणपती, दसरा, दिवाळी… आता एकामागे एक सण असल्यामुळे प्रत्येकाला एक प्रश्न पडला असेल की, शॉपिंग नेमकी करायची तरी कुठून. मुंबईत शॉपिंगसाठी अनेक मार्केट आहेत. पण कोणता मार्केट चांगला ठरले याबद्दल मनात शंका असते. मात्र मुंबईत एक मार्केट असं आहे, जे प्रत्येक मुंबईकरांना बेस्ट वाटतं… जेथे लागणऱ्या सर्व वस्तू कमी दरात मिळतात. अगदी कपड्यांपासून ते सजावटीच्या वस्तूंपर्यत… सांगायचं झालं तर, शहरातील दादर मार्केट हे कोणत्याही सणाच्या तयारीसाठी आणि कमी दरात विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

दादर येथील मार्केटमध्ये खाद्यपदार्थांपासून ते कपडे आणि सजावटीच्या वस्तूंपर्यंत सर्व काही मिळत असलं, तरी सणासुदीच्या कपड्यांच्या खरेदीसाठी हे एक विशेषतः खिशाला परवडणारं ठिकाण आहे. लहान मुलांच्या कपड्यांपासून महिलांच्या साड्यांपर्यंत या मार्केटमध्ये सर्वकाही मिळतं. रस्त्याच्या बाजूने चालताना कधी सर्व शॉपिंग होईल हे तुम्हाला कळणार देखील नाही.

दादर मार्केटमध्ये सध्या गणपतीच्या साहित्याची रेलचेल पाहायला मिळत आहे; तिथे सर्वत्र पणत्या, मोदकाचे साहित्य आणि भिंतीवर लावायच्या सजावटीच्या वस्तू, मखर दिसून येत आहेत. दादरमध्ये मुंबईतील सर्वात मोठी फुल-मार्केट असल्याने, लवकरच तेथील फुले आणि फळांच्या दुकानांवरही ग्राहकांची मोठी गर्दी उसळेल. येथे खरेदी करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी.

मार्केटमध्ये वस्तूंचे दर ठरलेले असतील, असं सांगण्यात येत असेल तर, बार्गेनिंग करण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. असं केल्यास तुम्हाला 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आणखी सवलत मिळू शकेल. सध्या अनेक जण गणपतीच्या तयारीत आहेत, त्यामुळे खरेदीसाठी दादर येथील मार्केट महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील खरेदी करायची असेल तर, दादर मार्केट बेस्ट आहे.

कपड्यांच्या शॉपिंगबद्दल सांगायचं झालं तर, या बाजारात तुम्ही 800 रुपयांना अशी साडी खरेदी करू शकता, जिची किंमत एखाद्या सामान्य दुकानात 1200 ते 1500 रुपयांच्या दरम्यान असते. खाद्यपदार्थ, कपडे किंवा सजावटीच्या वस्तू अशा सर्वच प्रकारच्या वस्तूंमध्ये तुम्हाला किमतीतील असाच फरक दिसून येईल. म्हणूनच, सण-उत्सवांच्या खरेदीसाठी मुंबईभरातून लोक दादरला गर्दी करतात. हा बाजार रेल्वे स्थानकाच्या अगदी बाहेर सुरू होऊन सर्व दिशांना पसरलेला आहे; दादरच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना दररोज गजबजलेले आणि खिशाला परवडणारे बाजार पाहायला मिळतात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घराचं काम बघताना सुचलं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, 53 वर्षांपासून प्रत्येकाचं आवडतं, 100 वेळा ऐकलं तरी…
  • डेटिंग ॲप, रात्रीची वेळ आणि पार्टी, मुलीला कारमध्ये ढकलले अन्… व्हायरल कपलची कहाणी काय आहे?
  • हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
  • Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा संतापला, अंगावर धावून गेला, Live मॅचमधील राड्याचा Video Viral
  • जिवलग मित्रांचा तो चित्रपट ठरला शेवटचा; मध्यरात्री घरी परतताना नाशिकमध्ये घडले नको ते

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in