• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खामेनेई यांच्या अंत्ययात्रेदरम्यान 3 हजार लोकांच्या मृत्यूची शक्यता, रेड क्रॉसच्या चिठ्ठीने झोप उडाली, आधीच…

July 4, 2026 by admin Leave a Comment


28 फेब्रुवारी रोजी अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झालं होतं. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण इराण शोकसागरात बुडालं. आजपासून त्यांच्या अंत्ययात्रेला तेहरानमधून सुरुवात झाली आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेदरम्यान तीन हजार पर्यंत लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे, आणि त्यासाठी आधीच इराणमध्ये तयारीला देखील सुरुवात झाली आहे. जर्मनीमधील एका मीडिया हाऊसने तेहरामधून पाठवलेल्या एका गुप्त रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.

तेहरानमध्ये उपस्थित असलेल्या एका पत्रकाराच्या हाती, इराणमधील राष्ट्रीय आपत्ती निवारण संघटना रेड क्रॉसची एक टॉप -सीक्रेट चिठ्ठी लागली आहे. ही चिठ्ठी इराणचे उपराष्ट्रपती मोहम्मद -रेजा आरिफ यांना पाठवण्यात आली आहे. या चिठ्ठीमध्ये स्पष्ट शब्दात असा उल्लेख करण्यात आला आहे की, अंत्ययात्रेदरम्यान चेंगराचेंगरीची घटना आणि इतर दुर्घटनांमुळे 1500 ते 3000 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

ही शक्यता लक्षात घेऊनच इराणच्या अधिकाऱ्यांकडून तेहरानमध्ये असलेलं सर्वात मोठं कब्रस्थान बेहिश्त-ए- जहरा येथे हजारो नव्या कबरी खोदण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तेहरान महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गर्दी जास्त वाढली तर उष्णतेमुळे आणि इतर घटनांमुळे या अंत्ययात्रेत हजारो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. आजपासून अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे, गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुरुवातील अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर भीषण युद्धाला सुरुवात झाली. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर तर इराण अधिकच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं, इराणने केलेल्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं प्रचंड नुकसान झालं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in