• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खवळलेल्या नदीत म्हशीने वाचवले तरुणाचे प्राण… त्या Video मधून थरार समोर… नेपाळमध्ये बचाव कार्याला वेग

August 30, 2026 by admin Leave a Comment


नेपाळवर निसर्ग कोपला आहे. तिबेटमधील हिम तलाव फुटल्याने भोटेकाशी आणि त्रिशुली नदीत एकाएक, अचानक महापूर आला. उत्तर नेपाळमधील अनेक जिल्ह्यांसह गावांना त्याचा फटका बसला. 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर 2500 हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत. अनेक गावं आणि वसाहती महापूरात वाहून गेली आहेत. अनेक घरं, वसाहती, पूलं, रस्ते नामशेष झाली आहेत. या महापूराचे भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. निसर्गाचा प्रकोप आणि चमत्काराच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. महापूराच्या वेढ्यात अडकलेल्या एका कुटुंबाचा व्हिडिओ समोर आला होता. तर आता एका म्हशीने खवळलेल्या नदीतून तरुणाचे प्राण वाचवल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

म्हशीने वाचवले तरुणाचे प्राण

हा व्हिडिओ उत्तर नेपाळमधील आहे. नदीकाठच्या इमारतीवरून हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसून येते. एक तरूण उफाळलेल्या नदीपात्रात पार मध्यापर्यंत पोहचलेला दिसतो. नदीला पूर आल्याचे स्पष्ट दिसत आहे. नदीत काही झाडं वाहून येताना दिसत आहे. हा तरुण या नदीत म्हशीच्या पाठीवर बसलेला दिसतो. नदीचे पाणी वाढत असल्याचे लक्षात येताच ही म्हैस वेगाने नदीच्या बाहेर पडताना दिसत आहे. अशा धोकादायक परिस्थितीत नदीत जाण्याचे धाडस न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अनेकांना महापूरामुळे प्राण गमवावे लागलेले आहे. या म्हशीमुळे तरुणाचे प्राण वाचल्याचे या व्हिडिओतून समोर येत आहे.

मान्छेलाई यसरी बचायो भैसीले, चमत्कार! #nepal #highlight #everyoneシ゚ pic.twitter.com/NixkjabgJd

— Nirmal Prasai🇳🇵 (@NirmalPrasai5) August 30, 2026

नेपाळ पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन

नेपाळमधील राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणासह नेपाळ पोलीसही लोकांच्या मदतीला धावली आहे. यापूर्वी आलेल्या महापूराने अनेक घरांना वेढा दिला. यामुळे अनेक भागात चिखल साचलेला आहे. लोकांना घराच्या बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. संसाधनाचा अभाव असतानाही आहे त्या पर्यायांचा वापर करून लोकांना घराबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

एका व्हिडिओत एका घरातून वृद्ध नागरिकांना बाहेर काढतानाचे दृश्य कैद झाले आहे. दोरी आणि वायरच्या साहाय्याने या स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस नागरिकांना घरातून सुरक्षित बाहेर काढत असल्याचे दिसते. वृद्ध नागरिकांना आपल्या पाठीवर घेत एका पोलिसांना घराबाहेर आणल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. अनेक ठिकाणी बचाव आणि शोध कार्याला वेग आला आहे.

नेपाल प्रहरी निरन्तर उद्धारमा !! pic.twitter.com/AZynmvD3v5

— Nepal Police (@NepalPoliceHQ) August 29, 2026

यापूर्वी आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि टीमला देशात मदतीला नेपाळने नकार दिला होता. पण अनेक परदेशी नागरीक अडकल्याने नेपाळवर दबाव वाढला. त्यानंतर भारतासह चीनच्या बचाव आणि शोध पथकाला मदत करण्यास नेपाळने परवानगी दिली आहे. भारताचे पथक कालच काठमांडूला पोहचले आणि त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केल्याचे समजते.

मृतांचा आकडा वाढला

बीबीसी या वृत्तसंस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार नेपाळमधील महापूराने 675 जणांचा जीव घेतला. तर 2500 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. यामध्ये नेपाळच्या नागरिकांसह, भारत आणि इतर देशातील नागरिकांचा समावेश आहे. तर तिबेटमधील मृतांचा आकडा समोर आला आहे. तिथे 16 लोकांना प्राण गमवावा लागला आहे. तर 546 लोक बेपत्ता असल्याचे चीनच्या माध्यमांनी दावा केला आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर अजूनही बचाव पथकाचे काम सुरू आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पहिला नंबर माझा… ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
  • माजी महिला खासदाराची का झालीये अशी अवस्था! विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम… Photo पाहून व्हाल हैराण
  • नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच, अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकाकडून शोधाशोध
  • Laxman Hake: मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी… लक्ष्मण हाके यांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले अफाट ओबीसी…
  • Arshad Warsi: या सगळ्याची सुरुवात कंगनाने केली..; अर्शद वारसी स्पष्टच बोलला, नेमका वाद काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in