• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

July 22, 2026 by admin Leave a Comment


भारतीय संघात खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची काही कमी नाही. पण अनुभवामुळे खेळाडूंची निवड करणं कठीण आहे. त्यात खेळाडूंचा फिटनेस हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असं असताना अष्टपैलू हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट म्हणून नितीश कुमार रेड्डीकडे पाहिलं जात आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवडही केली गेली. पण दुखापतग्रस्त असल्याने मालिकेपूर्वीच माघार घ्यावी लागली. नितीश कुमार रेड्डीला संधी मिळते, पण खेळताना दुखापतींचा सामना अधिक करावा लागत आहे. आता नितीश कुमार रेड्डीच्या दुखापतीबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. नितीश कुमार रेड्डीला संघ व्यवस्थापन वारंवार वेगवान गोलंदाजी करण्यास भाग पाडत आहे, त्यामुळे दुखापत होत असल्याचं दावा केला जात आहे. हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत नितीश कुमार रेड्डीकडून फार अपेक्षा आहेत. त्याने जवळपास 140 किमी प्रती तासाने वेगवान गोलंदाजी करावी असं गृहीत धरलं जात आहे. इतकंच काय तर वेग वाढवण्यासाठी बॉलिंग कोच स्टीफन जोन्ससोबत नितीश रेड्डीने काम केलं. पण हा निर्णय त्याच्याच अंगाशी आला.

नितीश कुमार रेड्डीकडून अवांतर अपेक्षा!

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नितीश कुमार रेड्डीने आपल्या गोलंदाजीचा वेग वाढवण्यासाठी विदेशी प्रशिक्षकाची मदत घेतली. टीम इंडियाच्या प्रत्येक सराव शिबिरात नितीश कुमार रेड्डी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचा हा प्रयत्न फसला आणि अधिकच नुकसान झालं. कारण गती वाढवण्यासाठी त्यावर संयमी काम करणं गरजेचं होतं. पण प्रत्येक शिबिरात त्याच्याकडून वेगाने चेंडू टाकण्याचा सराव केला गेला. यामुळे संघाची गरज पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न त्याच्या अंगलट आला आणि दुखापतग्रस्त झाला. आता दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

आकाश दीपसोबतही असंच घडलं का?

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याचीही अशीच कथा आहे. आकाश दीप तसा फिट अँड फाईन असायचा. पण मागच्या वर्षी आयपीएल स्पर्धेत दुखापत झाली आणि त्यातून सावरला. पण त्यानंतर सलग दोन कसोटी सामने खेळला आणि दुखापतग्रस्त झाला. आकाश दीपला हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. आता बरा झाला असून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
  • मोठी बातमी! नेपाळ आला वठणीवर, भारताबाबत थेट मोठी घोषणा, बालेन शाह..
  • कॉक्रोच जनता पार्टीचा नेमका फायदा कुणाला? भाजपला की काँग्रेसला? त्या अहवालाने अनेकांना धक्का
  • Thalapathy Vijay: थलपती विजय यांना मोठा धक्का, थेट मुख्यमंत्रिपद जाणार? हायकोर्टात नेमकं काय घडलं?
  • Supriya Sule : अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन्…; राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in