• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘क्राइम पेट्रोल’मध्ये अजय देवगणने जागा घेताच अनुप सोनीची पहिली प्रतिक्रिया; “यावर बोलण्यासारखं..”

August 13, 2026 by admin Leave a Comment


टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय शो ‘क्राइम पेट्रोल’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अनुप सोनी या शोचं सूत्रसंचालन करत होता. आता अनुपच्या जागी अभिनेत्री अजय देवगणची या शोमध्ये एण्ट्री झाली आहे. ‘क्राइम पेट्रोल’च्या नव्या एपिसोड्सचं सूत्रसंचालन आता अजय देवगण करणार आहे. याबद्दल चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण अनुप सोनीच्या होस्टिंगला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत होता. आता अजयच्या निवडीवर अनुपने प्रतिक्रिया दिली आहे.

‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अनुप म्हणाला, “यावर बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही. क्राइम पेट्रोलशी मी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलो गेलो होतो. या शोसोबत माझं खास नातं आहे. इतक्या वर्षांत मला प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळाला, जे प्रेम मिळालं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी अजय देवगणचा मोठा चाहता आहे. त्यांच्यासोबत मी कामसुद्धा केलं आहे. ‘गंगाजल’ आणि ‘अपहरण’ या चित्रपटांमध्ये आम्ही एकत्र काम केलं. मला असं वाटतं की या शोमध्ये ते त्यांची खास स्टाइल घेऊन येतील. त्यामुळे नव्या सिझनसाठी मी टीमला शुभेच्छा देतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगणने 15 एपिसोड्सची शूटिंग पूर्ण केली आहे. ‘क्राइम पेट्रोल’चा हा नवीन सिझन येत्या 31 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोबद्दल अजयने म्हटलं होतं, “क्राइम पेट्रोलचं सूत्रसंचालन करणं ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो सुरू आहे आणि त्यातून प्रेक्षकांना जागरुक केलं जातं. या नव्या सिझनमध्ये आम्ही अशा कथा घेऊन येत आहोत, ज्यांनी या देशाला हादरवून सोडलं आहे. नागरिकांनी घाबरण्याऐवजी कशाप्रकारे सतर्क राहिलं पाहिजे, हे मी यातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.”

‘क्राइम पेट्रोल’ या शोचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये अनुप सोनीच्या ऐवजी अजय देवगण दिसल्याने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. या प्रोमोमध्ये अजय देशातील सध्याच्या गुन्हेगारी परिस्थितीवर बोलताना दिसला. बहुतेक प्रकरणांमध्ये गुन्हेगार हे त्याच्या जवळचेच असतात, असं तो यात म्हणतो. या शोनंतर अजय देवगण त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in