• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोणत्याही क्षणी होऊ शकते मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांची 2 तास बैठक, इराणसोबतच्या युद्धात..

May 30, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणसोबतचे युद्ध थांबवायचे आहे. इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय युद्ध थांबवण्याकरिता जगाचा अमेरिकेवर मोठा दबाव आहे. जागतिक बाजाराची या युद्धाने वाट लागली. एक महिना चालण्याचा अंदाज असलेले हे युद्ध तब्बल 3 महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. आता युद्ध थांबवण्याकरिता मोठ्या घडामोडींना वेग आला. अमेरिकेत बैठकांवर बैठका होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम कराराकरिता तब्बल 2 तास बैठक घेतली. या बैठकीकडे जगाच्या नजरा होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोणती तरी मोठी घोषणा केली जाईल, असा अंदाज सर्वांना होता. या घोषणेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कारण जवळपास सर्वच मुद्द्यांमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सहमती झाल्याचे कळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार करणार असे जगाला वाटत होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या संभाव्य करारावरील अंतिम निर्णय पुढे ढकलला आहे. त्यांनी याकरिता वेळ मागितला. व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये आपल्या राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत जवळपास दोन तास त्यांनी बैठक घेतली. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, ही बैठक अंदाजे दोन तास चालली.

सिच्युएशन रूममधील बैठक संपली असून ती अंदाजे दोन तास चालली. या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करण्याचा अंदाज होता. मात्र, याकरिता त्यांनी वेळ घेतला. ट्रम्प केवळ अशाच कराराचा पाठपुरावा करतील जो अमेरिकेसाठी चांगला असेल आणि त्यांच्या रेडलाइन्सची पूर्तता करेल. इराण कधीही अणुशस्त्र मिळवू शकत नाही, याकरिता अमेरिका ठाम आहे.

इराण देखील काही मुद्द्यामध्ये ठाम आहे. 24 तासामध्ये इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा होऊ शकते. त्याबाबत पाऊलेही उचलली जात आहेत. गेल्या तीन महिन्यापासून युद्ध सुरू आहे. ऊर्जेचे संकट आहे. इराण आणि अमेरिका या या दोन्ही देशांकडून जी पाऊले उचलली जात आहेत, त्यावरून हे स्पष्ट आहे की, इराण आणि अमेरिका यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धविराम करार होऊ शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Farmer Loan Waiver: शेतकर्‍यांसाठी गुडन्यूज! खात्यात खटाखट पैसा, दुसरा हप्ता वितरीत, यादीत नाव कसं चेक करणार?
  • एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची ही अभिनेत्री, हृतिक, रणबीर, रणवीरसह केलं काम; ओळखलं का ?
  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in