• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोंबडीचे की बदकाचे, कोणते अंडे जास्त पौष्टिक? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर?

July 4, 2026 by admin Leave a Comment


अंडी हा प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत मानले जाते आणि वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजारात कोंबडी आणि बदक या दोन्हींची अंडी सहज उपलब्ध असतात. मात्र, या दोन्ही अंड्यांमधील फरक अनेकांना माहिती नसतो. चव, आकार आणि पौष्टिक मूल्यांच्या बाबतीत या अंड्यांमध्ये लक्षणीय फरक असतो. आज आपण कोंबडी आणि बदकाच्या अंड्यांमधील फरक आणि आरोग्यासाठी कोणते अंडे अधिक फायदेशीर ठरू शकते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आकार आणि रचना

बदकाचे अंडे हे सामान्यतः कोंबडीच्या अंड्यापेक्षा आकाराने मोठे असते. त्याचे कवच अधिक जाड आणि मजबूत असल्यामुळे ते जास्त काळ सुरक्षित राहते. याउलट, कोंबडीचे अंडे आकाराने लहान आणि वजनाने हलके असते. या दोन्ही प्रकारची अंडी बाजारात सहज उपलब्ध होत असतात.

पोषक घटक

कोंबडीच्या अंड्यांच्या तुलनेत बदकाच्या अंड्यांमध्ये कॅलरी, प्रथिने आणि फॅटचे प्रमाण अधिक असते. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, सेलेनियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. दुसरीकडे, कोंबडीच्या अंड्यांमध्ये कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात आणणारे लोक याचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात.

चवीतही असतो फरक

बदकाच्या अंड्यांची चव अधिक गडद आणि क्रीमी मानली जाते. त्यामुळे बेकरी पदार्थ आणि पारंपरिक पाककृतींमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तर कोंबडीच्या अंड्यांची चव सौम्य असल्यामुळे ती रोजच्या आहारात अधिक लोकप्रिय आहेत. खासकरून लहान मुले आणि वृद्ध लोक कोंबडीच्या अंड्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात.

कोणते अंडे अधिक फायदेशीर?

जर तुम्हाला जास्त प्रोटीन आणि ऊर्जा हवी असेल, तर बदकाचे अंडे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, कमी कॅलरीचा आहार घेत असाल किंवा रोज अंडी खात असाल, तर कोंबडीचे अंडे अधिक योग्य ठरते. दोन्ही प्रकारच्या अंड्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास ती आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. त्यामुळे तुमच्या शरिराच्या गरजेनुसार योग्य अंडे निवडावे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in