• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॉल करायची ही काय वेळ? प्रिती झिंटावर चिडलेला सनी देओल; बिग बींसमोरच पोलखोल

August 12, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सनी देओल ‘अँग्री यंग मॅन’ म्हणूनही ओळखला जातो. सनीच्या तापट स्वभावामुळे इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्याला घाबरतात. अभिनेत्री प्रिती झिंटाने सनीच्या रागाचा असाच एक किस्सा सांगितला आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये प्रिती आणि सनी देओल एकत्र उपस्थित होते. या सिझनची धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्याच एपिसोडमध्ये आमिर खान, सनी देओल आणि प्रिती झिंटा यांसारखे कलाकार पाहुणे म्हणून शोमध्ये पोहोचले होते. याच एपिसोडमध्ये प्रितीने सनी देओलच्या रागाचा हा किस्सा बिग बींसमोर सर्वांना सांगितला. सनी आणि बॉबी देओल यांच्यात काय फरत आहे, असा प्रश्न प्रितीला विचारण्यात आला होता. कारण तिने या दोन्ही देओल भावंडांसोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सनी देओलचा किस्सा सांगताना प्रिती म्हणाली, “सनी आणि बॉबी दोघं पूर्णपणे वेगळे आहेत. बॉबी माझा मित्र आहे. मी त्याला तेव्हापासून ओळखते, जेव्हा आम्ही दोघांनीही चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं नव्हतं. बॉबीकडे एक व्हॅन असायची आणि त्याच व्हॅनमधून तो बाहेर फिरायला जायचा. एकेदिवशी मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेली होती. आम्ही सर्वांनी मिळून बॉबीला फोन करून त्याच्याकडे भेटायला येणार असल्याचं कळवणार होतो. त्याला फोन करण्याची जबाबदारी अखेर मलाच देण्यात आली होती. त्यावेळी मोबाइल फोन नव्हता, लँडलाइनवर कॉल लावले जात होते.”

“मी बॉबी देओलच्या घरातील लँडलाइनवर फोन केला. तेव्हा मला याची कल्पनाच नव्हती की याचा (सनी देओल) ढाई किलोचा हात माझा कॉल उचलणार. मी त्याला विचारलं की, हॅलो.. मी बॉबीशी बोलू शकते का? कदाचित त्यावेळी रात्रीचे 10.30 किंवा 11 वाजले असतील. सनी मला रागातच म्हणाला, एखाद्याच्या घरी कॉल करण्याची ही वेळ आहे का? हे ऐकून मी इतकी घाबरली आणि लगेच फोन ठेवला”, असं प्रिती सांगताच बिग बींसह सेटवरील सर्वजण हसू लागतात.

सनी देओलसोबत चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केल्यानंतरही त्याची खूप भीती वाटत असल्याची प्रामाणिक कबुली तिने दिली. दोन-तीन चित्रपटांनंतर ही भीती हळूहळू कमी होत गेली, असं तिने सांगितलं. प्रितीने हा किस्सा सांगितल्यानंतर सनीने त्याची बाजू मांडली. “आमच्या घरातील नियम कडक होते. आम्हाला रात्री 8 वाजल्यानंतर बाहेर जायची परवानगी नव्हती. त्यादिवशी रात्रीचे 10.30 वाजले होते. मी बॉबीला माझ्या मुलासारखाच मानतो. त्यामुळे शिस्तीच्या बाबतीत मी त्याच्यासोबतही खूप कठोर राहिलो. तरीसुद्धा माझी नजर चुकवत तो इथे तिथे फिरायला जायचाच”, असं सनीने सांगितलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in