• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

July 22, 2026 by admin Leave a Comment


जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. संसदेवरील मोर्चामुळे आंदोलन चिघळले. त्यानंतरही अभिजीत दिपके आणि आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अनेक बड्या नेत्यांनी आंदोलनाला भेट दिली. इतके मोठे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. मात्र, सरकारकडून अजूनही धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा घेतला जात नाही. यादरम्यानच धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा हिला लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीला प्रचंड ट्रोल केले जात आहे. शेवटी याला कंटाळून तिने इंस्टाग्राम अकाऊंट बंद केले. धर्मेंद्र प्रसाद यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच त्यांची मुलगी निमिषा हिच्या विदेशातील शिक्षणाचा मुद्द्या उठवला जात आहे.

हेच नाही तर हे प्रकरण निमिषा विदेशातील ज्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेते, तिथपर्यंत आंदोलन पोहोचले. निमिषा प्रधान हिने 2023 मध्ये अमेरिकेच्या मॅसाचुसेट्स येथील टफ्ट्स विद्यापीठच्या प्लेचर स्कूल ऑफ लॉ अॅन्ड डिप्लोमेसीमध्ये मास्टर ऑफ लॉची पदवी घेतली. ती सध्या यूएस इंडिया स्टेटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये सिनिअर असोसिएट म्हणून काम करत आहे.

आता सोशल मीडियावरील युजर्सच्या निशाण्यावर टफ्ट्स विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या सोशल मिडिया पोस्टवरील कमेंटमध्ये जात धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अशाप्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत. यासोबतच निमिषा हिला सस्पेंड करण्याची मागणी केली जात आहे. निमिषा हिला टॅग करत युजर्सने लिहिले की, तू विदेशात याकरिता शिक्षण घेत आहे, कारण तुला माहिती आहे की, येथील शिक्षण क्षेत्र अपयशी आहे.

या वादात धर्मेंद्र प्रधान यांच्या कुटुंबियांना देखील ओढले जात आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, या वादात धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीला ओढणे चुकीचे आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीला सतत ट्रोल केले जात आहे. विदेशात शिक्षणाचा तिचा मुद्दा उचलला जातोय. शेवटी तिने वैतागून इंस्टाग्राम वापरणे सोडले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवरील दबाव वाढला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange: मनोज जरांगे यांचा एल्गार, आमरण उपोषणापूर्वी सरकारची मोठी भूमिका, अखेर तो डाव टाकलाच…
  • Manoj Jarange: भगवं वादळ मुंबईत धडकणार, किती मराठे राजधानीत येणार? मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला, सरकारपुढे मोठे आव्हान
  • सनी देओल याने मुस्लीम भूमिका साकारल्यानंतर काय झालं? ‘बंटवारा 1947’ सिनेमा फ्लॉप होताच, शबाना आझमी यांचा रोखठोख प्रश्न…
  • भर शोमध्ये ओरीने समय रैनाला दिली अटकेची धमकी, दोघांमध्ये नेमकं काय घडलं?
  • रोहित पवारांकडे ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाके यांचा गौप्यस्फोट; मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in