• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केस विंचरल्यावर तुमच्या हातात केसांचा गुच्छ येतो का? ‘या’ 4 तज्ज्ञांच्या टिप्स केस बनवतील काळे, दाट आणि लांब

June 24, 2026 by admin Leave a Comment


केस गळणे, केस कमकुवत होणे, दुतोंडी केसांची समस्या आणि केसांची वाढ मंदावणे या आजकाल सामान्य समस्या झाल्या आहेत. यासाठी आपली जीवनशैली मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. जर शरीरात योग्य पोषणाचा अभाव असेल, तर त्याचे परिणाम थेट केसांवर दिसतात. जर तुमच्या आहारात प्रथिने, लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असेल, तर त्याचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर आणि वाढीवर होतो. याशिवाय वारंवार किंवा खूप कमी वेळा केस धुतल्याने स्कॅल्पच्या नैसर्गिक तेलावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे केस कमकुवत होऊ शकतात. चला तर मग तज्ञांकडून जाणून घेऊया की आपले केस निरोगी कसे ठेवायचे.

स्कॅल्पचे आरोग्य

स्कॅल्प हा केसांच्या वाढीचा पाया आहे. कोंडा, केसांमध्ये उत्पादनांचा साठा आणि रक्ताभिसरणातील कमतरता यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. केसांवर वारंवार हिटींग टूल्सचा वापर, रासायनिक उत्पादने आणि घट्ट हेअर स्टाईल यांचा सतत वापर केल्याने देखील केसांचे नुकसान होऊ शकते.

प्रथिने, लोह आणि ओमेगा-3 ही अत्यावश्यक पोषक तत्वे आहेत-

केस मजबूत करण्यासाठी प्रथिने हे सर्वात महत्त्वाचे पोषक तत्व आहे , कारण केसांचा सुमारे 80 ते 85% टक्के भाग केराटिन नावाच्या प्रथिनाने बनलेला असतो. डाळी, टोफू, सुकामेवा आणि क्विनोआ यांसारखे पदार्थ केसांच्या वाढीस चालना देऊ शकतात. लोह आणि जस्त देखील केसांची मुळे मजबूत करतात. पालक, बदाम, काजू आणि भोपळ्याच्या बिया केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. तर ओमेगा-3 फॅटी ॲसिड स्कॅल्प निरोगी ठेवण्यास आणि केसांची वाढ करण्यास मदत करतात. चिया सीड्स आणि अक्रोडमध्ये आढळतात.

केसांच्या वाढीसाठी 4 प्रभावी घरगुती उपाय

1. खोबरेल तेल आणि एरंडेल तेलाचा हेअर मास्क

खोबरेल तेल केसांचे पोषण करते आणि त्यांना आर्द्रता देते , तर एरंडेल तेलातील रिसिनोलिक ॲसिड स्कॅल्प मऊ आणि आर्द्र ठेवण्यास मदत करते. हे मिश्रण तयार करण्यासाठी, 2 चमचे खोबरेल तेल आणि 1 चमचा एरंडेल तेल एकत्र करा. हे तेल हलके गरम करून स्कॅल्पवर लावा आणि मालिश करा. 1 तासानंतर सौम्य शाम्पूने धुऊन टाका.

2. कोरफड आणि रोझमेरी हेअर रिन्स

कोरफड स्कॅल्पला आर्द्रता देते, तर रोझमेरी केसांच्या वाढीस मदत करते. पेस्ट तयार करण्यासाठी, थोड्याशा पाण्यात 2 चमचे कोरफडीचा गर आणि रोझमेरी तेलाचे काही थेंब मिक्स करा. केस धुतल्यानंतर या पेस्टने 4-5 वेळा स्वच्छ रिन्स करा.

3. नैसर्गिक स्कॅल्प सीरम

या सीरमसाठी, 1 चमचा जोजोबा तेल, 1 चमचा बदाम तेल, 1 चमचा आर्गन तेल आणि पेपरमिंट इसेन्शियल ऑइलचे 3 थेंब एकत्र करा. झोपण्यापूर्वी स्कॅल्पवर काही थेंब लावा आणि हळुवारपणे मालिश करा.

4. केस वाढवण्यासाठी अळशीचा वापर करा

अळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे स्कॅल्पच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या लवचिकतेसाठी फायदेशीर ठरते. हे तयार करण्यासाठी, 2 चमचे अळशी 2 कप पाण्यात जेलसारखे घट्ट होईपर्यंत उकळा. थंड झाल्यावर ही जेल केसांवर लाव, काही वेळाने केस साध्या पाण्याने धुवा. अशाने केस वाढण्यास मदत होईल.

हे लक्षात ठेवा की काहीवेळा केस गळणे हे अनुवांशिक कारणांमुळे होते. अशा परिस्थितीत घरगुती उपायांचा प्रभाव मर्यादित असू शकतो, त्यामुळे गरज भासल्यास तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSMT : रेल्वे इंजिनमध्ये अजगर जातीचे सर्पपिल्लू आढळल्याने खळबळ, घटनेचे फोटो पाहून व्हाल हैराण…
  • ICC Test Ranking: कसोटीत पुन्हा जो रुट अव्वल, पण भारताच्या जसप्रीत बुमराहला मोठा धक्का
  • ‘तारक मेहता..’मधील ‘बाघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
  • रेशन वितरण प्रणालीत मोठा बदल, या कुटुंबांना आता कमी धान्य मिळणार; सरकारचा प्रस्तावित निर्णय काय?
  • ‘या’ 5 ठिकाणी जेवण करणे अशुभ, असं करताय तर आजच व्हा सावध, कारण…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in