• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट, सिया अन् चेतन कोड वर्डमध्ये काय बोलले? तो फोन पोलिसांकडून जप्त

July 4, 2026 by admin Leave a Comment


काही दिवसांपूर्वी पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून त्याची हत्या करण्यात आली होती. त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांनीच केतनची हत्या केल्याचं समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात आता दररोज नव नवीन खुलासे समोर येत आहेत. सिया आणि चेतन यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी न्यायालयात करण्यात आली, मात्र न्यायालयाने आता चेतन आणि सिया या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान या प्रकरणावर बोलताना आता पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे, पोलीस तपासात असं आढळून आलं आहे की, सिया आणि चेतन हे दोघं एकमेकांसोबत कोड वर्डमध्ये बोलत होते. मात्र त्या कोर्ड वर्डचा नेमका अर्थ काय? आणि त्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं, हे अजून स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

या घटनेबाबत माहिती देताना तपास अधिकारी मनोज पवार यांनी सांगितलं की, या घटनाक्रमाबद्दल चेतनकडे कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच सियाकडे देखील चौकशी करण्यात आली आहे, गुरुवारी सकाळी आम्ही सियाचा दुसरा मोबाईल देखील जप्त केला आहे. यापूर्वी सिया आणि चेतन यांचा एक -एक मोबाईल फोन पोलिसांनी आधीच जप्त केला होता, त्यानंतर आता सियाचा दुसरा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे.

डिजिटल तपासासून असं समोर आलं आहे की, सिया आणि चेतन हे मोबाईलवरून एकमेकांसोबत संवाद साधताना कोड वर्ड्सचा वापर करायचे. पोलिसांनी जप्त केलेल्या दुसऱ्या मोबाईलमधून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता हा मोबाईल फोन फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आला आहे, सिया आणि चेतन यांनी कोड वर्डमधून नेमकं काय संभाषण केलं आणि त्याचा संबंध हा केतनच्या हत्येशी आहे का? याचा उलगाडा होण्याची शक्यता आहे, त्यामुळेच पोलिसांकडून पुन्हा एकदा न्यायालयात चेतन आणि सियाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लान
  • काँग्रेसला मोठा धक्का बसणार, माजी मुख्यमंत्र्यांसहित 2 दिग्गज नेते पक्ष सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • या अभिनेत्याचं नाव ऐकताच रजनीकांत आणि नसीरुद्दीन शाह यांनी चित्रपट करण्यास दिलेला नकार, कारण…
  • High Court : हलालाच्या नावाखाली सामूहिक बलात्कार, हायकोर्टाने कठोर शब्दात फटकारलं, ट्रिपल तलाकच्या आडून तुम्हाला..
  • वास्तूशास्त्रात सांगितलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पाच वस्तू कधीच जमिनीवर ठेऊ नका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in