• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केतन अग्रवाल प्रकरणाची मोठी अपडेट! त्या तीन प्रश्नांचं गूढ वाढलं, कोर्टात युक्तीवाद काय? चेतनचे कपडे…

June 29, 2026 by admin Leave a Comment


केतन अग्रवाल प्रकरणी अटकेत असलेली सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींची कोठडी संपल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस, सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. पोलिसांनी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी सात दिवसांनी वाढवण्याची विनंती कोर्टाला केली आहे. त्यासाठी त्यांनी तीन कारणांचा शोध घ्यायचं असल्याचं म्हटलं आहे. तर त्याला आरोपींच्या वकिलांनी कडाडून विरोध केला आहे. सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. किल्ल्यावर जाऊन रिक्रिएशनही करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा सात दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी आज कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. या दोन आरोपींनी कट केला का ते तपासायचं आहे. दोघांच्याही मोबाईलमधील डीलिट केलेला डेटा रिकव्हर करायचं आहे. आरोपीकडून पडताळणी करायची आहे. लोहगडावर अन्य लोकांशी संवाद साधला आहे, त्याचा तपास करायचा आहे? प्री वेडिंगसाठी जात असताना सियाने केतनाच पासपोर्ट फेकून दिला. त्याचा तपास करायचा आहे. किल्ल्याची रेकी केली का याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.

सोशल मीडियावर काय सर्च केलं?

तसेच सोशल मीडियावर या दोघांनी कोणत्या साईटचा वापर केला. तेही तपासायचं आहे. चेतनने नातेवाईकांकडे मोबाईल दिला होता. त्यावेळी काही डेटा डीलिट केला का? आरोपी चेतनच्या अंगावरील कपडे जप्त करायचे आहेत, असा युक्तिवादही करण्यात आला.

चेतनचे कपडे…

कट रचला असल्याचं निष्पन्न झालं आहे. गुन्हा कसा करायचा याचा सराव त्यांनी केला होता का? याची माहिती घ्यायची आहे. कट कुठं बसून केला हे तपासायचे आहे. सियाप्रमाणे चेतनला घेऊन रिक्रियेशन करायचं आहे. बालीला प्री वेडिंग शूटला जायचं नव्हतं म्हणून पासपोर्ट फाडले, ते केतनचे पासपोर्ट शोधायचे आहेत. लोहगडावर जाऊन रेकी केली का? हे तपासायचे आहे. या कटात कोणी सहभागी आहे का? हे सुद्धा तपासायचे आहे. केतनचा मोबाईल काही वेळाने देण्यात आला, त्यातील माहिती रिकव्हर करायची आहे. त्यांनी माहिती लपवली आहे, ती मिळवायची आहे. चेतनचे कपडे हस्तगत करायचे आहेत. त्यामुळे या दोघांची सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.

तीन प्रश्नांची उत्तरे…

यावेळी सरकारी वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केला. तीन प्रश्नांचं गूढ कायम आहे. ते आम्हाला शोधायचं आहे. त्यासाठी या दोघांची कोठडी वाढवून हवी आहे. कट कुठं रचला? रेकी कधी केली? हत्या कशी करायची याचा प्रात्यक्षिक कुठं केलं? या तीन प्रश्नांची माहिती त्यांच्याकडून घ्यायची आहे. रिक्रियेशन झालेलं आहे, पण दोघांना घेऊन रिक्रियेशन करायचं आहे. या कटात कोणी सहभागी आहे का? याचाही शोध घ्यायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

पीसीची गरज नाही

सियाचे वकील विपुल दुशिंग यांनी यावेळी जोरदार प्रतिवाद केला. तांत्रिक तपास, चौकशी, नाट्य रूपांतर झालं आहे. आता पुढचा तपास तांत्रिक आहे, मग पीसीची गरज वाटत नाही. पंकज बन्सल यांचं जजमेंट आहे. भारतात नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये अटक व्हायला नको, असं नाही चालत. तुमचं नाव आहे आणि तुम्ही घेऊन गेला. ग्राउंड ऑफ अरेस्ट आणि रिझन्स ऑफ अरेस्ट यात फरक आहे. सियाच्या अटकेच्या कारणांमध्ये 1 ते 5 लिहिलेलं आहे. (ते वाचून वेळ वाया घालवत नाही, हायलाईट्स केलंय, ते आपण पहा) ग्राउंड ऑफ अरेस्ट पर्सनाईज डॉक्युमेंट आहे. चेतनच्या अटकेतील 1 ते 3 कारणं अगदी तशीच आहेत, असं वकील दुशिंग यांनी कोर्टाला सांगितलं.

यावळी त्यांनी निमित भुता प्रकरणाचा दाखला देत ही अटक कशी चुकीची आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता रिमांड वाढवण्यासाठी जे कारण दिलंय, यात कारण एकचं आहे, त्याचे चार भाग देण्यात आलेत. आधीची सात दिवस कोठडी यासाठीचं घेतली होती, असं सांगतानाच मीडिया ट्रायल सुरू आहे. मीडिया ट्रायल थांबवायला सांगणं गरजेचं आहे. कोर्टाच्या आधी माहिती मीडियाकडे कशी काय जाते? आता मीडियाने सगळं दाखवलं म्हणजे, तपास तर पूर्ण झालाय, असंही ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in