• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

केंद्र सरकारची मोठी ॲक्शन, शरीफसह मुनीरला झटका, ते 23 पाकिस्तानी नागरीक दहशतवादी घोषीत

July 4, 2026 by admin Leave a Comment


23 Pakistani citizens declared as a Terrorists: मोदी सरकारने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानला अजून एक दणका दिला आहे. गृह मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, पाकिस्तानातील 23 जणांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. हे 23 दहशतवाद्यांचा UAPA च्या चौथ्या अनुसूचीत समावेश करण्यात आला आहे. यातील अनेक दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयब्बा या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. या दोन्ही दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. याच ठिकाणी त्यांचे प्रशिक्षण केंद्र आणि रसद पुरवठा केंद्र आहेत.

हे दहशतवादी हिट लिस्टवर

या दहशतवाद्यांमध्ये मसूद इलियास काश्मिरी, मोहम्मद मुसादिक, मुफ्ती मोहम्मद असगर कान आणि हाफिज अब्दुल शकूर ही नाव हिट लिस्टवर आहेत. 2016 मध्ये नगरोटा येथील भारतीय लष्करी शिबिरावर हल्ला आणि 2022 मध्ये जम्मूतील सुंजवां येथील सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ल्यात त्यांचा सहभाग उघड झाला आहे. यासह इतरांवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. लष्कर-ए-तैयब्बाचा अब्दुल रऊफ आणि हाफिज खालिद वलीद हे दोघेही कुख्यात हाफिज मोहम्मद सईदचे विश्वासू सहकारी आहेत.

त्या गद्दाराचे नावही यादीत

मोहम्मद शहीद फैसल उर्फ उस्ताद उर्फ जाकिर हे नाव अनेकांसाठी नवीन आहे. कारण तो मुळचा भारतीय आहे. बंगळुरू येथे तो राहत होता. सध्या तो पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये राहतो. त्याने पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारल्याची माहिती आहे. तो लष्कर-ए-तैयब्बा, अल-कायदा आणि ISIS या सर्व दहशतवादी संघटनांचा दुवा मानल्या जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादासाठी तरुणांची भरती करणे, त्यांना शस्त्रांचं प्रशिक्षण देणे. दहशतवादी कारवाया करणे. या दहशतवादी कारवायांसाठी जगभरातून पैसा जमा करणे हे उस्तादचे काम आहे.

UAPA अंतर्गत कोणती कारवाई?

गृहमंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध करत या दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. पाक पंतप्रधान शहबाज शरीफ, फील्ड मार्शल आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना हा झटका मानल्या जात आहे. ऑपरेशन सिंदूरपासून भारताची दहशतवादाविरोधातील धडक कारवाई पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे. झिरो टॉलरन्स धोरणात आता 23 दहशतवाद्यांची नाव जाहीर करत भारताने मोठी खेळी खेळली आहे. भारत पाक व्याप्त काश्मीर केव्हाही ताब्यात घेण्याची कारवाई करू शकतो, ही भीती सातत्याने पाकिस्तानला आहे. हे त्यातील मोठे पाऊल मानले जात आहे. चौथ्या यादीत 23 दहशतवाद्यांची नावं समाविष्ट केल्याने या दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा, त्यांची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दहशतवाद्यांची संपत्ती पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये आहे. भारत आता त्याविरोधात काय कारवाई करतो याकडे आंतरराष्ट्रीय समूहाचे लक्ष लागलेले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • India-Bhutan : जवळचा मित्र असूनही पेट्रोलच्या बाबतीत भूतानने भारताला दिला मोठा धक्का, विश्वास ठेवायला तयार नाही
  • राम मंदिरातील दानावर डल्ला… सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया… दोन शब्दात बोलले काय?
  • Vaibhav Sooryavanshi : New Chapter , दोनच शब्द.. वैभव सूर्यवंशीच्या नव्या पोस्टने खळबळ; काय घडतंय?
  • Pravin Tarde : ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 100 कोटींचा टप्पा गाठला पण कसा? फक्त थिएटर मधूनच कमाई झाली नाही तर…
  • केंद्र सरकारची मोठी ॲक्शन, शरीफसह मुनीरला झटका, ते 23 पाकिस्तानी नागरीक दहशतवादी घोषीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in