• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काहीही झालं तरी तिची जागा..; ‘बिग बॉस मराठी 6’तून बाहेर पडल्यानंतर राकेश बापट पुन्हा पूर्व पत्नीच्या प्रेमात?

April 22, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता राकेश बापट ‘बिग बॉस’ हा शो जिंकण्याच्या बाबतीत कमनशिबी ठरला. त्याने तीन वेळा या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला, परंतु तिन्ही वेळा त्याच्या पदरी निराशाच आली. ‘बिग बॉस मराठी 6’चा ग्रँड फिनाले 19 एप्रिल रोजी पार पडला आणि या सिझनमध्येही त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तन्वी कोलतेनं या सिझनचं विजेतेपद जिंकलं आहे. तब्बल शंभर दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर राकेश आता बाहेर पडला आहे. बाहेर आल्यानंतर त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूर्व पत्नी रिधी डोग्राविषयी प्रतिक्रिया दिली आहे. राकेश आणि रिधी यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता.

‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत राकेश म्हणाला, “घरातून बाहेर पडल्यानंतर माझं रिधीशी बोलणं झालं. तिने माझ्या खेळाचं कौतुक केलं. बिग बॉसमध्ये मी कोणत्याही मुखवट्याशिवाय वागत होतो, मी जसा आहे, तसा राहिलो, तेच तिला सर्वाधिक आवडलं आहे. ती आधीपासूनच मला कायम पाठिंबा देत राहिली आहे. आमच्या आयुष्यात काहीही झालं तरी माझ्या आयुष्यात तिची खास जागा कायम राहणार आहे. ते कधीच बदलणार नाही.”

राकेश बिग बॉसच्या घरात असताना रिधीने सोशल मीडियाद्वारे त्याच्यासाठी पाठिंबा दर्शविला होता. “मला राकेशचा खूप अभिमान आहे. तो जबरदस्त परफॉर्म करतोय. आम्हाला आणि मला त्याची खूप काळजी वाटत होती की, अरे देवा.. तू पुन्हा बिग बॉसच्या घरात जात आहेस. पण यावेळी तो खूप छान कामगिरी करतोय. तो जसा आहे तसाच तिथे वागतोय. आम्हाला जो राकेश माहीत आहे, तोच तिथे दिसतोय. मला खूप आनंद आहे की तो स्वत:च्या नियमांनुसार खेळ खेळतोय. राकेशला माझ्याकडून शुभेच्छा आहेतच, पण यावेळी त्याला अशा वेगळ्या पाठिंब्याची विशेष गरज वाटत नाही. तरीसुद्धा मी नेहमीच त्याच्यासाठी चिअर करत राहीन,” अशा शब्दांत रिधी व्यक्त झाली होती.

घटस्फोटानंतरही राकेश आणि रिधी यांच्यात मैत्रीचं नातं कायम आहे. आजही जेव्हा रिधीसमोर एखादी समस्या असते, तेव्हा ती पूर्व पती राकेशची मदत आवर्जून मागते. एका मुलाखतीत खुद्द रिधीनेच याची कबुली दिली होती. “राकेश माझा पूर्व पती असला तरी मला एखादी समस्या सतावत असेल तर मी त्याची मदत आवर्जून घेते. तो माझा पूर्व पती असला तरी माझा सर्वांत जवळचा मित्रसुद्धा आहे”, असं रिधीने स्पष्ट केलं होतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आचार्य चाणक्यांच्या ‘या’ 4 श्लोकांचा अर्थ आहे फार खोल, जीवनात ठरतील अत्यंत उपयोगी
  • KCC कर्ज थकले तर जमिनीचा लिलाव? योजनेचे नियम आणि अधिकार जाणून घ्या
  • Virat Kohli : आपला संबंध संपला..! विराट कोहली याने घेतला मोठा निर्णय
  • Ritesh – Genelia Deshmukh | रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटीचा प्रचार
  • ऐश्वर्याच्या Ex सोबत अभिषेक करणार काम, 22 वर्षानंतर दिसणार एकत्र, सिनेमाचे नाव काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in