• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कार ट्रेनने पाठवयाची असेल तर किती खर्च येतो आणि नियम काय ?

June 21, 2026 by admin Leave a Comment


जर तुम्हाला दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचे असेल तर लांबचा प्रवास करायचा असेल तर कार स्वत: चालवत नेण्यापेक्षा रेल्वे पार्सलने पाठवता येते. रेल्वेचा प्रवास सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर असतो. भारतीय रेल्वेने आता एक अशी सेवा दिली आहे. ज्यामुळे तुम्ही तुमची कार रेल्वेच्या पार्सल सेवेने दूर ठिकाणी पाठवू शकता. यात वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होते. आणि कारचे एक्स्ट्रा किलोमीटर देखील वाढत नाहीत.

रेल्वेची पार्सल सेवा ही सर्वात सोयीस्कर असते.पार्सल सेवेच्या अंतर्गत तुमची कार विशेष पार्सल व्हॅन वा लगेज कोचमध्ये सुरक्षित पद्धतीने ठेवता येते. आणि रेल्वेच्या पार्सल सेवेद्वारे तुमच्या गंतव्य स्थानकापर्यंत नेता येते. ही सेवा अशा लोकांसाठी गरजेची असते ज्यांना नोकरी, शिक्षण वा कोणा अन्य कारणाने दुसऱ्या शहरात जावे लागते.

कोणते डॉक्यूमेंट्स लागतात ?

कारचे पार्सल करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला रेल्वेच्या पार्सल ऑफीस जावे लागते. तेथे कारची आरसी, ओळख पत्र आणि अन्य कागदपत्रे जमा करावी लागतात. यानंतर कारची तपासणी केली जाते. आणि बुकींग प्रोसेस पूर्ण केली जाते. रेल्वे कारला स्वीकार करण्याच्याआधी हे देखील पाहिले जाते की कारची स्थिती कशी आहे, योग्य आहे की नाही.

कारला ट्रेनने पाठवण्याआधी त्याची कारची चांगल्या प्रकारे पॅक केली होती. सर्वसाधारणपणे कारच्या काचा, हेडलाईट आणि बाहेरील भागांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष कव्हर लावलेले असतात. यामुळे प्रवासात काचांना खरचटे वा अन्य नुकसान होण्याची शक्यता कमी होते.

पार्सल करण्याचे नियम आणि अटी ?

कार पाठवण्याचा खर्च अंतर आणि कारच्या आकारावर अवलंबून आहे. जेवढे जास्त अंतर असेल तेवढे पैसे भरावे लागतात. मात्र, लांबचा प्रवास कार स्वत: चालवून नेण्याच्या तुलनेत हा मार्ग जास्त सुविधाजनक आणि सोयीस्कर सिद्ध होऊ शकतो. याशिवाय पेट्रोल-डिझेलचा खर्च, टोल टॅक्स आणि रस्त्यातील प्रवासाचा थकवा या सर्व कटकटी पासून वाचता येते.

रेल्वे नियमांनुसार कारच्या टाकीत कमी इंधन असायला हवे, सुरक्षेमुळे कारमध्ये जास्त इंधन भरण्यास मनाई असते. बुकींगच्या वेळी रेल्वे अधिकारी तुम्हाला या संदर्भाती सर्व नियम आणि अटी सांगतात.

जेव्हा तुमची कार तुमच्या स्थानकावर पोहचतात. तेव्हा कार मालक आवश्यक डॉक्युमेंट्स दाखवून आपल्या कारला रिसिव्ह करु शकतात. कारला स्विकारताना त्या कारच्या स्थिती तपासण्याची सल्ला देखील दिला जातो. जर कोणतीही समस्या असेल तर रेल्वेचे अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! अखेर 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
  • अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला… पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर
  • PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
  • संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवर घडला मोठा अनर्थ; शूटिंगदरम्यान तंत्रज्ञाचा मृत्यू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in