• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कारच्या मागील काचेवर का असतात रेषा? पावसाळ्यात कसा होतो फायदा

August 1, 2026 by admin Leave a Comment


कारमध्ये अनेक खास सेफ्टी फीचर्स असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तिचा वापर होतो. पण त्याची माहिती कार चालकाला असतेच असे नाही. कारच्या मागील काचेवर अनेकदा तुम्ही बारीक आडव्या रेषा पाहिल्या असतील. काहींना वाटते की ते डिझाईनच आहे. पण प्रत्यक्षात या रेषा मोठ्या उपयोगी ठरतात. त्या रिअर विंडो डिफॉगर (Rear Window Defogger) म्हणून काम करतात. ते एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. पण या रेषा नेमक्या कशासाठी असतात? काय आहे त्यामागील तंत्रज्ञान?

डिफॉगरचे काम तरी काय?

हिवाळ्यात अथवा पावसाळ्यात कारच्या मागील काचेवर धुके, ओलावा आणि पाण्याचे थेंब साचतात. यामुळे मागील बाजूचा रस्ता अनेकदा अस्पष्ट दिसतो. आपल्याकडी रस्त्यावरील धुळ, चिखल कारच्या मागील बाजूवर उडतो आणि साचतो. अशावेळी मागून येणारे छोटे वाहन चटकन लक्षात येत नाही. अपघाताचा धोका वाढतो. अशावेळी डिफॉगरचे बटण दाबल्यास काचेवरील बारीक आडव्या रेषा गरम होतात. त्यांच्या उष्णतेमुळे काचेवरील धुके आणि पाण्याचे थेंब काही क्षणात नाहीसे होतात आणि मागील दृश्य मिडल मिररमधून स्पष्ट दिसते. कार चालवताना चालकाला मागील बाजूच्या वाहनांचा अंदाज येतो.

डिफॉगर कसा करणार सुरू?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अनेकदा कारच्या सर्व काचांवर धुक्यामुळे, दवबिंदूचा थर जमा होतो. कारचे समोरील आणि मागील दृश्यमानता कमी होते. कारमधील वातावरण आणि बाह्य वातावरणाचा परिणाम होऊन कारच्या दोन्ही काचमधून समोरील अथवा मागील काही दिसत नाही. अशावेळी कारच्या डॅशबोर्डवर स्वतंत्र डिफॉगर स्वीच दिलेला असतो. ड्रायव्हरने हे बटण दाबताच या रेषांमधून हलका विद्युत प्रवाह जातो. या आडव्या रेषा गरम होतात, काचेवर साचलेले धुके, ओलावा क्षणात दूर होतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या फीचरचा सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी, रात्री अधिक वापर होतो. यामुळे कारमधील तापमानही वाढते.

कार चालवताना महत्त्वाचे फीचर

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरते. मागील आणि समोरील काच स्वच्छ ठेवण्यासाठी डिफॉगरचा वापर करण्यात येतो. परिणामी दृश्यमानता वाढते. समोरील आणि मागील दृश्य स्पष्ट दिसतात. कार मागे घेताना, रिव्हर्स घेताना, गर्दीच्या ठिकाणी, पावसात वाहनांच्या गर्दीत स्पष्ट दिसावे यासाठी या फीचर्सचा वापर होतो. कारचा अपघात होण्याचा धोका कमी होतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in