• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कान्समध्ये जाणाऱ्या प्रत्येकांनी उर्फी जावेदकडून शिकलं पाहिजे, नवीन ड्रेस पाहून सर्वच थक्क, होतंय प्रचंड कौतुक

May 24, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर आपल्या हटके फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर नेहमीच व्हायरल होत असतात. विशेषतः तिच्या वेगवेगळ्या आणि अनोख्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ती नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असते. उर्फीचा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो तर अनेक जण तिच्या फॅशनमधील क्रिएटिव्हिटीचेही कौतुक करताना दिसतात.

यावेळी उर्फी जावेदने परिधान केलेल्या एका खास ‘बबल ड्रेस’मुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. तिचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही वेळातच तो प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

उर्फीचा हटके लूक

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर Viral Bhayani ने शनिवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उर्फी जावेदचा हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये उर्फी एका सार्वजनिक ठिकाणी दिसत असून तिने अतिशय वेगळा बबल थीमवर आधारित ड्रेस परिधान केला आहे. या आउटफिटची खास गोष्ट म्हणजे ड्रेसवर केवळ बबल्सची डिझाइन नव्हती तर त्यातून प्रत्यक्ष बबल्स बाहेर येताना दिसत होते. तिच्या या युनिक फॅशन आयडियाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका चाहत्याने तिला बबल गर्ल असे संबोधले तर दुसऱ्या युजरने क्रिएटिव्हिटी लेव्हल असे म्हणत तिचे कौतुक केले. आणखी एका चाहत्याने कान्स आणि मेट गालामध्ये जाणाऱ्यांनी उर्फीकडून काहीतरी शिकायला हवे अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी उर्फीला खूप इंटेलिजेंट गर्ल असेही म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कौतुक आणि ट्रोल

एका बाजूला उर्फीच्या या वेगळ्या फॅशन सेन्सचे कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, टीका आणि ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत उर्फी कायम आपल्या वेगळ्या शैलीत चाहत्यांसमोर येताना दिसते.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली उर्फी जावेद तिच्या ड्रेस मेकिंगचे व्हिडीओ देखील अनेकदा शेअर करत असते. त्यातून तिच्या आउटफिट्ससाठी घेतली जाणारी मेहनत आणि त्यामागील कल्पकता स्पष्ट दिसून येते. स्वतःच्या फॅशन आयडियावर ती मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचे तिच्या व्हिडीओंमधून दिसते.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
  • Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in