
भोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशी घटना समोर आली आहे, ज्याने नात्यांची पवित्रता आणि सामाजिक मर्यादांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सख्या पुतण्या चक्क काकीच्याच प्रेमात पडला होता. मात्र, या लव्हस्टोरीने असे हिंसक वळण घेतले की पोलिसांना कळाल्यानंतर त्यांच्या पायाखलची जमीनच सरकली आहे. आता नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या…
ही घटना बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील आहे. येथील एक काकी आणि तिच्या सख्ख्या पुतण्यामध्ये निर्माण झालेल्या प्रेमसंबंधांनी हिंसक आणि आत्मघाती वळण घेतले. दोघांनी एकमेकांसोबत राहू शकत नसल्याच्या नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाची मुळे डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या एका लग्नाशी जोडलेली आहेत. गावातील विनोद (नाव बदललेले आहे) या तरुणाचा विवाह 25 वर्षीय नेहाशी (नाव बदललेले आहे) झाला होता. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच विनोद आपल्या उपजीविकेसाठी पुण्याला निघून गेला. पतीच्या अनुपस्थितीत नेहा आणि तिचा 17 वर्षीय पुतण्या विजय (नाव बदललेले आहे) यांच्यात जवळीक वाढू लागली. लवकरच या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
पतीचे परत आला आणि वाद वाढला
गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या या ‘सीक्रेट अफेअर’ची कुणकुण जेव्हा नातेवाईकांना लागली, तेव्हा घरात एकच खळबळ माजली. प्रकरण मिटवण्यासाठी आणि बिघडलेली परिस्थिती सावरण्यासाठी विनोदला तातडीने पुण्याहून परत बोलावण्यात आले. 16 एप्रिल रोजी विनोद घरी पोहोचताच तणाव शिगेला पोहोचला. पुतण्या विजयने जेव्हा आपल्या काका आणि काकीला एकत्र पाहिले, तेव्हा परिस्थिती अधिकच बिघडली. ईर्ष्या आणि हताश झालेल्या त्याने प्रथम आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु नातेवाईकांनी त्याला वाचवले.
रुग्णालयातील खाटेवरही लग्नाचा हट्ट
या वादाचा अंत अत्यंत दुःखद झाला. लोकं काय म्हणतील या भीतीने आणि एकमेकांपासून दूर होण्याच्या भीतीने आधी काकी नेहाने उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. ही माहिती मिळताच प्रियकर पुतण्यानेही तेच विषारी द्रव्य प्राशन केले. सध्या दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अवस्थेतही दोघे एकमेकांसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा हट्ट धरून बसले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. समाजात या अनैतिक नात्याबद्दल आणि त्याच्या भीषण परिणामाबद्दल तीव्र चर्चा सुरू आहे.
Leave a Reply