• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘कसोटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकियाच्या मुलाच्या गाडीवर कोसळलं झाडं; गाडीचा चक्काचूर, त्याची प्रकृती…

July 4, 2026 by admin Leave a Comment


सध्या मुंबईला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. अनेक ठिकाणी गुडघ्यांपर्यंत साचलं आहे तर, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. अशात ‘कसोटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिच्या मुलाच्या गाडीवर झाड कोसळल्याची बातमी समोर येत आहे. मुंबई मुसळधार पाऊस होत असतानाच ही घटना घडली आहे. उर्वशी ढोलकिया हिचा मुलगा आणि अभिनेता क्षितिज ढोलकिया याच्या गाडीवर झाड उन्मळून पडलं आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे, गाडीवर जेव्हा झाड कोसळलं, तेव्हा गाडीत कोणीच नव्हतं… नाहीतर मोठी घटना घडली असती.

घडलेल्या घटनेचा व्हिडीओ क्षितिज याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले. व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार, त्याच्या गाडीवर एक मोठं झाड कोसळलं आहे. या घटनेत गाडीचं मोठं नुकसात झाल्याचं दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत क्षितिज म्हणाला, ‘एक भयानक संकेत की आयुष्य किती अनिश्चित असू शकतं… नशीब तेव्हा मी गाडीत नव्हतो आणि सगळे सुरक्षित आहेत… मुंबई पोलीस आणि फायर ब्रिगेट यांचे आभार… ते तात्काळ मदतीसाठी धावत आहे… त्यांचा मी कायम आभारी राहिल…’

क्षितिज शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार, झाड त्याच्या गाडीवरुन काढण्यात आलं होतं. हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीचा लेक म्हणाला, ‘मोठी दुर्घटना घडणार होती, पण मी वाचलो.. त्यासाठी आभारी आहे…’, क्षितिज याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की अपघात किती भयानक होता. त्या वेळी जर क्षितिज गाडीत असता तर मोठी घटना घडली असती.

मुंबईचा पाऊस…

पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांना आता बरसणाऱ्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. अनेकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये देखील पाणी भरलं आहे. 3 जुलै पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनरांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे. तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये रेड अर्लट देखील जारी करण्यात आला आहे.

काय करतो क्षितिज ढोलकिया?

क्षितिज ढोलकिया याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याने एकता कपूर हिच्या ‘नागीन’ मालिकेतून करियरची सुरुवात केली आहे. क्षितिज ‘नागीन 7’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला. क्षितिज याने टीव्ही विश्वात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील क्षितिज कायम सक्रिय असतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in