• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

करोडपती उद्योजकासोबत अभिनेत्री चार भिंतीत उरकरणार लग्न, केलेत एग्स फ्रीज, ‘ती’ आहे तरी कोण?

June 10, 2026 by admin Leave a Comment


झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयु्ष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. जी कोट्यावधींच्या मालकाशी लग्न करणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री आकांशा रंजन आहे… दिग्दर्शक शरण शर्मा याच्यासोबत आकांशा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रिपोर्टनुसार, आकांशा आणि शरण पुढच्या महिन्यात कुटुंबियांच्या उपस्थित लग्न करणार आहेत. आकांशा आणि शरण गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनी देखील त्यांचं नातं कायम लाईमलाईट पासून दूर ठेवलं. शिवाय नात्याबद्दल अधिकृत घोषणा देखील केली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांशा आणि शरण 11 जुलै रोजी लग्नबंधना अडकणार आहे.. 12 जुलै रोजी दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रंगणार आहे.. असं देखील सांगितलं जात आहे की, रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन मुंबईतील मोठ्या हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. हा विवाहसोहळा पूर्णपणे खाजगी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे नियोजन केलं जात आहे.

यासाठी निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आलेल्या नाहीत; केवळ कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनाच आमंत्रित केलं जाईल अशी माहिती समोर येत आहे. आकांशा आणि शरण यांनी 2022 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 6 महिने दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणाला कळू देखील दिलं नाही… त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला.

आता दोघांच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे. पण दोघांनी देखील नात्याचा सर्वांसमोर स्वीकार केलेला नाही. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. आकांक्षाने सांगितले होते की, तिने आपल्या भविष्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी हा निर्णय घेतला असून, तिने या प्रक्रियेचं वर्णन ‘आवश्यक आणि सक्षम करणारे पाऊल’ असं केलं आहे.

सध्या तरी लग्नाबाबत आकांक्षा किंवा शरण यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही; मात्र, जर या चर्चा खऱ्या ठरल्या, तर या जुलैमध्ये बॉलीवूडमध्ये एक अत्यंत हाय प्रोफाईल विवाह सोहळा पाहायला मिळू शकतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या बंडखोरीवर शरद पवार बोलले स्पष्ट, थेट..
  • Supriya Sule : शरद पवार पक्षाचे आमदार फुटणार का? राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अनुपस्थितीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..
  • एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फसलंच होतं… देवेंद्र फडणवीस धावून आले अन्… पडद्यामागे नेमकं काय घडलं? सहाव्या खासदाराने…
  • आरारारा खतरनाक.. प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ने कमावला तब्बल इतका नफा
  • मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब… राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in