• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

करा आदळ-आपट झुकत नसतो बापट… पुण्यात डीजे प्रकरणात राडा..

September 3, 2026 by admin Leave a Comment


एक सर्वसामान्य पुणेकरानं सुरु केलेल्या डीजेविरोधातल्या लढ्यानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघतोय…तर्कशुद्ध युक्तीवाद हल्ली महाराष्ट्रात शेवटची घटका मोजत असताना बापट मुद्देसूदपणे डीजेचा विरोध करतायत… ते निशस्र असले तरी त्यांचे मुद्दे, शब्द आणि संदर्भांच्या तलवारीनं डिजेसमर्थक शब्दबंबाळ झालेत…सरतेशेवटी विचार संपल्यानंतर विकार जडत असल्यानं बुद्धीपूर्ण युक्तीवादाच्या खेळात मनगटखोर पैलवाल उतरलेत… परिणामी अशाच एका संतोष चव्हाण नावाचा भ्याड हल्लेखोर मुद्द्याऐवजी गुद्द्यावर उतरला.. मात्र, 15 दिवसांपूर्वी लाखो पुणेकरांसारखे सर्वसामान्य असलेले विद्यानंद बापट महाराष्ट्रात कसे पोहोचले…डीजेविरोधाचा चेहरा का बनले..त्याचं उत्तर 24 ऑगस्टला पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत दडलंय… गणेशोत्सवाच्या तोंडावर पालिकेतहरकतींची बैठक सुरु होती., तेव्हा बापटांनी पहिल्यांदा डीजेविरोधाचा मुद्दा मांडला..

ते ऐकताच भाजपचे काही नगरसेवकांनी गदारोळ सुरु केला…सभागृहातला आवाज दाबला गेल्यानंतर बापट माध्यमांसमोर आले आणि त्यांच्या बिनतोड युक्तीवादानं डीजेच्या गंभीर प्रश्नाला खरोखर वाचा फुटली…भीतीपोटी जे लोक डीजेविरोधात ब्र शब्द काढत नव्हते., ते लोक खुलेपणानं बोलायला लागली… एरव्ही जशा प्रत्येक राजकीय मुद्द्याच्या चिंध्या-चिंध्या करुन मूळ मुद्द्याचा मुर्दा पाडला जातो.

तसाच प्रकार यावेळीही काही डीजे समर्थक आणि पुण्यातील कथित नेत्यांनी करण्याचा प्रयत्न केला…मात्र गणिताच्या पेपरला इंगज्रीची प्रश्नपत्रिका यावी.,तसे बापट डीजेसमर्थकांच्या वाट्याला आल्यानं अनेकांची भंबेरी उडाली… डीजे म्हणजे धर्म आणि कर्णकर्कश आवाज म्हणजे गणेशोत्सव इतकाच आवाका असलेल्यांच्या मेंदूला बापटांच्या युक्तीवादानं भोवळ येवू लागली…

37 वर्षीय बापट अविवाहित आहेत कॉर्मसमधून पदवी घेतलीय. पुण्यातल्या नारायण पेठेत त्यांचं छोटसं घर आहे. सध्या बीपीओ क्षेत्रात ते काम करतात…काही डीजे समर्थकांनी इयत्ता पहिलीपासून ते हयातीपर्यंत ऐकलेही नसतील., . इतकं प्रचंड शब्दभांडार बापटांकडे आहे.. फक्त शब्दांचाच भडिमार नसून बापटांकडे त्यासाठी तर्काचीही जोड आहे. स्वतःच्या मुद्द्याच्या समर्थनात ते पुण्याच्या नारायण पेठेपासून ते नेदरलँडपर्यंतचे संदर्भ देतात…आणि मुळात सण-उत्सव आहेत कशासाठी.

ते जातायत कोणत्या दिशेला., यावर त्यांचा मुख्य भर आहे….इंग्रजीपासून ते संस्कृतपर्यंत, पुराणकाळापासून
मध्ययुगीन भारतापर्यंत आणि पुण्यातल्या पेठांपासून ते ब्रह्मांडात आतापर्यंत शोधल्या गेलेल्या आकाशमालांपर्यत…
बापटांचं वाचन दांडगं आहे.. पण हा व्यासंग स्वतःपुरताच ठेवून कुजवण्यापेक्षा त्याचा जनजागृतीसाठी कामी यावा
हा विवेकही बापटांकडे आहे., म्हणूनच 15 दिवसांपूर्वी सर्वसामान्य चेहरेपट्टीचा पुणेकर असलेल्या एका व्यक्तीचे
मुद्दे राज्यात अनेकांना पटले…

बापट मूळचे रत्नागिरीतले आहेत., प्रत्येक मध्यमवर्गीयाचं असतं तसंच रत्नागिरीतल्या एका गावात त्यांचं छोटं घर आहे. आई-वडिल पुण्याहून गावी राहायला गेलेत. हल्ल्यांच्या बातमीनं आई-वडिल चिंतीत झाले असले तरी मुलासह त्यांच्या मुद्द्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. टिळकांनी गणेशोत्सव हा लोकांना एकत्र करण्यासाठी सुरु केला….साध्य आणि साधन गणेशोत्सव असला तरी त्याचा मुख्य हेतू परकीय सत्तेविरोधात एकजुटीचा होता…

आज अनेक डीजेसमर्थक मंडळी गणपती आणि डीजे यापैकी साध्य आणि साधन कुणाला मानतात., हा प्रश्न त्यांनी स्वतःला करायला हवा… आज जर टिळक असते तर ते कुणाच्या बाजूनं उभे राहिले असते..याचं उत्तर त्यांना मिळेल…एकजुटीचा हा सोहळा फक्त डीजे नावाच्या कर्णकर्कश यंत्रामुळे फुटीचं कारण ठरतोय..आणि ज्या महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा तत्वज्ञानाच्या पंडितांना तर्कतीर्थाची उपाधी देण्याचा राहिलाय, त्याच महाराष्ट्रात तर्कावर
बोलणाऱ्यांना मारहाण केली जातेय…

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाच्या पंगतीसाठी परवानगी लागणार? केटरर्सला अगोदरच द्यावी लागणार माहिती… तुकाराम मुंढेंचा नवा नियम काय?
  • धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
  • मोठी बातमी! कोल्हापुरात तुफान राडा, राजू शेट्टी, क्षीरसागर यांचे समर्थक भिडले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
  • तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
  • मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in