
हिंद महासागरात भारताची लष्करी ताकद वाढली आहे. कराचीसह संपूर्ण पाकिस्तानी किनारपट्टी भारतीय नौदलाच्या टप्प्यात आहे. नौदलासाठी अत्याधुनिक राफेल -M (Rafale Marine) खरेदी करण्यात आलेली आहे. लवकरच हे अत्याधुनिक लढाऊ विमान विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर तैनात करण्यात येतील. या नवीन घडामोडींमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत. समुद्रातील आव्हानं पेलणे शेजारील देशाला दिवसागणिक अवघड होत आहे. पाकिस्तानी संरक्षण तज्ज्ञानुसार, विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर राफेल-M राफेल तैनात झाल्यावर भारतीय नौदलाची मारक क्षमता कित्येकपटीने वाढले. चीनच्या जीवावर उड्या मारणाऱ्या पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
चीनी बनावटीचे J-10 CE ठरणार फुस्स
पाकिस्तानने त्यांच्या नौदलात गेल्या काही वर्षात चीनकडून खरेदी केलेल्या J-10CE मल्टिरोल लढाऊ विमानांचा भरणा केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागानुसार पाकिस्तान वायुदलाकडे असे 36 लढाऊ विमान आहेत. भारताने 2025 मध्ये फ्रान्सकडून नौसेनेसाठी 26 राफेल-M लढाऊ विमानांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. विमानवाहू नौकांवरून होणाऱ्या कारवाया आणि नौदल युद्धासाठी ती तयार करण्यात आली आहेत.
पाकिस्तानच्या संरक्षण तज्ज्ञानुसार भारताने खरेदी केलेली राफेल -M ही लढाऊ विमानांची फळी चीनच्या J-10CE मल्टिरोल लढाऊ विमानांपेक्षा कित्येक पटीने सरस, प्रगत आहे. विमानातील तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे आणि नेटवर्क केंद्रित युद्धक्षमता या विमानांची जमेची बाजू आहे. सामरिक हालचालींसाठी आणि पुढील घडामोडींसाठी ही विमानं ताफ्यात असणं अर्धी लढाई जिंकल्यासारखं असल्याचा पाकिस्तानी तज्ज्ञांचा दावा आहे.
फायटर जेटच नाही तर ही आहे भारताची ताकद
संरक्षण तज्ज्ञानुसार, भारताची खरी ताकद ही केवळ 4.5 पिढीतील राफेल-M नाही तर त्यासोबत असणारा कॅरियर स्ट्राईक ग्रुप (CSG) आहे. या गटात आधुनिक डेस्ट्रॉयर, फ्रिगेट, पाणबुडी, फ्लीट सपोर्ट शिप, लांबपल्ल्याचे रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम आणि अनेकस्तरीय एअर डिफेन्स नेटवर्क यांचा समावेश असतो. विशाखापटण्णम क्लास आणि कोलकत्ता क्लास या अत्याधुनिक विध्वंसक प्रणाली या युद्ध नौकाचे संरक्षण करतात. एअर डिफेन्स सिस्टिम दूरनच शत्रू राष्ट्रांचे लढाऊ विमान, ड्रोन आणि अंटी शिप मिसाईल हेरते आणि त्यावर थेट अचूक मारा करते. त्यातच राफेल-M आयएनएस विक्रांतवर आरूढ होणार असल्याने कराचीसह पाकिस्तानचा किनारपट्टा भारताच्या अगदी समीप आला आहे. या नवीन घडामोडींमुळे शत्रू देशाची चिंता वाढली आहे. पाकिस्तानला पुन्हा आगळीक करणे सोपे राहिलेले नाही.
Leave a Reply