
Rain Alert, IMD Weather Update 24 July: महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहणार आहे. पुणे घाटमाथा येथे हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर कोकण, नाशिक, सातारा घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण पूर्व राजस्थानात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्र आणि गुजरात येथे जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात खूप जादा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर पश्चिम भारतात २४ ते ३० जुलै दरम्यान हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड येथे मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply