• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कपडे बदलावे अशी पार्टी बदललायला… रोहित पवारांची सचिन अहिरांवर सडकून टीका

July 1, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहे. आधी सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी देखील ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकला. त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावर संमिश्र प्रतिक्रिया येतेना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सचिन अहिर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

रोहित पवारांची सचिन अहिरांवर टीका

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “एकतर सचिन भाऊ यांनी जो प्रवेश केला त्याबद्दल आश्चर्य वाटत आहे. कारण, ते आदित्य ठाकरे यांच्या फार जवळ होते. पाहिले सचिन भाऊ आमच्या पक्षात होते. नंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर काम केले आणि आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षत ते गेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे नेत्यांनी कपडे बदलावे असे विचार आणि पार्टी बदलायला लागले तर त्यांच्यावर विश्वास राहणार नाही. राजकारणावरील लोकांचा विश्वास उडला तर लोकशाही वरती सुद्धा विश्वास राहणार नाही. हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. हे जे नेते आहेत ते स्वार्थी आहेत त्यामुळे लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. येत्या काळामध्ये काही नवीन नेते नवीन चेहरे तयार होतील.”

2029 ला भाजपा हा एकटा पक्ष राहील…

पुढे रोहित पवार यांनी आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. “आमदार आणि खासदार फोडण्याचा प्रयत्न भाजपा आणि मित्र पक्षाकडून होत आहे. प्रयत्न किती झाला तरी कुठनंही महत्त्वाचा आहे. आमचे आमदार आणि खासदार फुटणार नाही यांचा आम्हाला विश्वास आहे. 2029 ला डीलीमिनिशन कायदा बदलून मतदार संघ फोडून निवडणून यांसाठी भाजपचे प्रयत्न आहे. मात्र अजूनही त्यांना 40 खासदारांची गरज आहे. मात्र, त्यांना मतदान होणार नाही 2029 ला भाजपा हा एकटा पक्ष राहील” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार पुढे म्हणाले की, “केंद्र सरकार मधील भाजपचे नेते आणि राज्यातील भाजपचे नेते यांच्यामध्ये सगळेच चांगले आहेत असं नाही. तिथे वेगळ्या पद्धतीची स्पर्धा सुरू आहे. एकमेकांना ताकद दाखवण्याचे काम केलं होतं. एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून वरदस्त येत आहे असा अंदाज येत आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकत आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. म्हणून खासदार फोडण्याचे यश एकनाथ शिंदे यांना मिळत असल्याने त्यांना केंद्रातून मोठी ताकद मिळत आहे. पुढील काळात वेगळा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महायुतीतील सर्वच पक्ष 2029 मध्ये वेगवेगळे निवडणूक लढतील.”



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरेंची साथ हा बडा नेता सोडणार? थेट पहिली प्रतिक्रिया, एकनाथ शिंदे..
  • आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे काय कारणं? कॅप्टन श्रेयस अय्यरकडून भलतीच उत्तर; काही केल्या चूक मान्य करेना
  • Todays Gold Rate: वाह! सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे भाव पुन्हा घसरले, 10 ग्रॅमसाठी…
  • Kapoor Family: कपूर खानदानातील सर्वात शिकलेला स्टार कोण? रणबीरचा तर निकाल पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आले होते पाणी
  • कोण होत्या विजया मेहता? ज्यांनी विजय तेंडुलकरांपासून नाना पाटेकरांपर्यंत अनेकांना दिलं व्यासपीठ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in