• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओमराजे निंबाळकर यांची बैठक, थेट शिवसेना ठाकरे गटाची मोठी खेळी, एकनाथ शिंदेंना धक्का? 2 आमदार..

June 21, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली. त्यापैकी 5 खासदार नक्की कुठे आहेत, याबाबत माहिती नाही. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले. 6 खासदारांपैकी धाराशिवसचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील आहेत. लोकसभा अध्यक्षांना या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. त्यात ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे. काल ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निर्णय लागला. सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता पुराव्या अभावी करण्यात आली. ओमराजे निंबाळकर यांनी कालच स्पष्ट केली की, मी तळागाळात जाऊन लोकांसोबत चर्चा करून माझा राजकीय निर्णय एक ते दोन दिवसात घेईल. एकप्रकारे ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला.

ओमराजे निंबाळकर कोर्टात होते, त्यावेळी शिवसैनिक आक्रमक होत थेट कोर्टाबाहेर जमले होते. दुसरीकडे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानीही शिवसैनिक ठाकरे गटाचे जमले होते. बंडखोरी केलेल्या खासदारांना त्यांच्या मतदार संघात फिरू देणार नसल्याचे ठाकरे गटाने म्हटले. त्यातच आज ओमराजे निंबाळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मतदार संघात जाऊन संवाद साधणार आहेत, त्यानंतर आपली राजकीय भूमिका जाहीर करतील.

त्यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी शिवसेना ठाकरे गटाकडून केली जाणार आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या बैठकीला आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित राहणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.  आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी खासदार ओमराजे निंबाळकर यांची पक्षांतराबाबत करणार मनधरणी करणार आहेत.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज गोवर्धनवाडी येथे बोलावलेल्या शिवसैनिकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी हे बैठकीला उपस्थित राहून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करणार असल्याच्या चर्चा आहे.

संभाव्य पक्षांतराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, निष्ठावान शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय भूमिका निश्चित करण्याचा ओमराजे यांचा निर्णय आहे. कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी हे बैठकीत नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे. कालच कैलास पाटील हे मातोश्रीवर गेले होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in