• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओमराजेंना शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला, आदल्या रात्री काय काय केलं? ठाकरेंनी पहिल्यांदाच सगळं सांगितलं

June 28, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच ऑपरेश टायगर झालं, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ज्या-ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली, त्या -त्या मतदारसंघात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. आज ते शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत, त्यांना धाराशिवमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये बोलताना त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

जेव्हा मी खासदारांची बैठक बोलावली होती, तेव्हा मला यांनी न येण्याची वेगवेगळी कारणं दिली होती. तेव्हा मी यांना म्हटलो नका येऊ. मात्र जेव्हा यांचे चेहरे मला व्हिडीओमध्ये दिसायला लागले, तेव्हा मी ओमराजे निंबाळकरांना विचारलं, तुमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये. तुमच्यावर काही तणाव आहे का? की रात्री झोप झालेली नाहीये? तेव्हा ते म्हणाले नाही माझं सगळं बरोबर आहे, मी ठीक आहे, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, वाटलं काही तरी गडबड आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओमराजे निंबाळकर यांना जपण्याचा प्रयत्न मी शेवटपर्यंत केला. खोट कशाला सांगू? अगदी खासदार फुटण्याच्या आदल्या रात्री, मध्यरात्री दीड वाजता, मी कैलास पाटील आणि वरून सरदेसाई यांना त्यांना भेटण्यासाठी पाठवलं होतं, मी त्यांना हे देखील म्हणालो होतो, मला ओमराजे पाहिजे त्यांना खासदार पाहिजे आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : हातात पैसाच टिकत नाही, मग शुक्रवारी घरी आणा ही खास वनस्पती, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर
  • धो धो धो…धरणं भरणार, नद्यांना पूर, कुफान पाऊस बरसणार; पंजाबराव डख यांचा तातडीचा हवामान अंदाज!
  • ENG vs NZ: बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना सुरू असताना घेतली निवृत्ती, म्हणाला…
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचंय? मग चणक्यांच्या या चार गोष्टी ऐकाच
  • बालभारतीच्या सहावीच्या पुस्तकावरुन वाद ! वर्ण व्यवस्था आणि मांसाहाराचा उल्लेख वगळला ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in