• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐन पावसाळ्यात 4700 कोटींच्या महामार्गाला गेले तडे; 13 दिवसांआधी थाटामाटात झालं उद्घाटन

July 26, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात 4700 कोटींच्या महामार्गाला तडे गेल्याचा  प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर-लखनौ एक्स्प्रेसवेवर उद्घाटनानंतर 13 दिवसांतच तडे गेल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.  महामार्गाचं उद्घाटन हे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झालं होतं.

उद्घाटनाला होते केंद्रीय मंत्री

कानपूर-लखनौ महामार्गावरील कानपूर-लखनौ लेनवर उन्नावमधील कोरारीजवळ रस्ता खचल्याने तडे गेल्याचा प्रकार समोर आलाय. महामार्गाला तडे गेल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती केली आहे. महामार्गाला तडे गेल्याचा व्हि़डिओ समाजवादी पक्षाच्या मीडिया सेलने शेअर केला आहे. या प्रकारामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर उपस्थित केले जात आहेत. या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कोटींच्या रुपयांच्या महामार्गाचे उद्घाटन झालं. अवघ्या 12 दिवसांत महामार्गाला दुरुस्तीची गरज भासली आहे. या घटनेनंतर समाजवादी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशांची लुट केल्याचा आरोप केला आहे. भाजपकडून लोकांच्या पैशांची लुट सुरू आहे. पक्षाच्या मंचावरून खोटे आश्वासनं दिली जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.

 

Just 12 days after inauguration, the Lucknow–Kanpur Greenfield Elevated Expressway in Uttar Pradesh has reportedly developed damage.

Inaugurated by Defence Minister Rajnath Singh on 13 July

63 km long expressway built at a cost of ₹4,200 crore pic.twitter.com/LZxSZTmjCe

— Vineeth K (@DealsDhamaka) July 26, 2026

सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

समाजवादी पक्षाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एका आमदाराने म्हटलं की, विरोधकांना कोणतेही काम उरलं नाही. पावसाळ्यात नव्याने बांधलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत. रस्ता कुठेही खराब झाला असेल, त्याची तातडीने दुरुस्ती केली जाईल. विरोधी पक्षाकडे कोणताही अजेंडा नाही. छोटे छोटे मुद्दे उपस्थित करून संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत’.

लखनौ-कानपूर महामार्ग हा 63 किमी, सहा पदरी आहे. या महामार्गाचं उद्घाटन हे 13 जुलै 2026 रोजी झालं. या महामार्गामुळे लखनौ ते कानपूरच्या प्रवसासाठी अवघे 30 ते 40 मिनिटे लागतात. याआधी या प्रवासासाठी दोन ते तीन सात लागायचे.

 

Unnao, Uttar Pradesh: Just 12 days after its inauguration, a large section of the main route of the Lucknow-Kanpur Greenfield National Elevated Expressway, built at a cost of 4200 crore rupees, has sunk due to rains. Following the emergence of a video of the road collapse on… pic.twitter.com/xfpN8UbD2z

— IANS (@ians_india) July 26, 2026





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यांची 85% दृष्टी गेली, तब्येत बिघडली… इम्रान खान यांची तुरुंगात बिकट अवस्था, मुलांनी केला खुलासा
  • आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे
  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in