• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक निकाल अन् ओमराजेंचं राजकारण संपलं… वकिलाचा खळबळजनक दावा

June 20, 2026 by admin Leave a Comment


बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रतरणातील आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्यांच्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे मुंबईवरुन धाराशिवला निघालेले असताना दोन मारेकऱ्यांची कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून गोळीबार करत त्यांची हत्या धडाधड गोळ्या झाडल्या, त्यात पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी या दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र आता या प्रकरणाच्या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांचे वकील भूषण महाडिक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

माफीच्या साक्षीदाराने वेळोवेळी आपली विधाने बदलली – महाडिक

पद्मसिंह पाटील यांचे वकील भूषण महाडिक यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले की, ‘हे प्रकरण पूर्णपणे खोटे असल्याचा दावा करण्यात आला आहे. साक्षी-पुराव्यांच्या आधारे हे सर्व मांडण्यात आले असून, खऱ्या सूत्रधारांनी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. न्यायालयानेही स्पष्टपणे नमूद केले की, माफीचा साक्षीदार गोवण्यात आला असून त्याने वेळोवेळी आपली विधाने बदलली आहेत.’

पुढे बोलताना महाडिक यांनी म्हटले की, ‘हा गुन्हा 2006 सालचा असून, सुरुवातीला तपास पोलिसांकडे होता. नंतर तो नवी मुंबई क्राइम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर आनंदी देवी यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात एका आरोपीची नार्को चाचणी करण्यात आली होती, ज्याचा व्हिडिओ लीक झाल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. पुढे ही केस CBI कडे सोपवण्यात आली. 2008 मध्ये त्यासंदर्भात आदेश देण्यात आले आणि 2009 पासून CBI ने तपास सुरू केला.

राकेश मारिया यांनी चौकशी

वकील भूषण महाडिक यांनी पुढे बोलताना म्हटले की, तपासादरम्यान माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी माफीच्या साक्षीदाराला आपण ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी CBI ला पत्र लिहून हस्तक्षेप केल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. स्टेशन डायरीमध्ये संबंधित नोंदी नसल्याचेही समोर आले. राकेश मारिया यांनी स्वतः मान्य केले की त्यांनी डायरी पाहिली नव्हती. तसेच माफीच्या साक्षीदाराचा ताबा घेण्यास हरकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

ओमराजेंचं राजकारण संपलं

माफीच्या साक्षीदारावर बोलताना महाडिक यांनी म्हटले की, ‘माफीचा साक्षीदार आर्थर रोड जेलमध्ये होता आणि 2009 पर्यंत त्याच्यावर अत्याचार झाल्याचा आरोपही त्याने केला आहे. तपास सुरु केला, गाडी दाखवली. हॉटेलची एन्ट्री दाखवली. माफिचा साक्षीदार प्रत्येकवेळी कहाणी बदलतोय. याला पोलिसांची पूर्ण माहिती होती, प्रोसेसची माहिती होती. पुढे ओमराजेंवर बोलताना महाडिक यांनी म्हटले की, ही केस संपली म्हणजे ओमराजे यांचं राजकारण देखील संपलं. ते स्वतः म्हणाले याच प्रकरणामुळे राजकारणात त्यांची एन्ट्री झाली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in