• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं.. ‘एक होतं माळीण’चा थरकाप उडवणारा टीझर

July 1, 2026 by admin Leave a Comment


माळीण हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील एक गाव. पाऊस पडावा म्हणून वरूण राजाची प्रार्थना करणारे माळीण गावातील ग्रामस्थ आदल्या दिवशी रात्री गाढ झोपी गेले आणि त्याच रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण गावच त्या पावसात वाहून गेलं. कल्पनाही करता येणार नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. याच सत्यघटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 24 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत असून नुकताच त्याचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

चित्रपटाची कथा ही पूर्णतः सत्य घटनेवर आधारित असून चित्रपटाचे दिग्दर्शक राजु राणे यांनी या चित्रपटासाठी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून योग्य माहिती घेऊन अचूक कथानक मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. चित्रपटाचं चित्रीकरण हे बदलापूर इथं करण्यात आलं आहे. कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर यांनी उभा केलेला माळीण गावचा सेट हा विशेष उल्लेखनीय आहे. दमदार कलाकार आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि संगीत ही या चित्रपटाची बलस्थानं असून टीझर पाहताना अंगावर शहारे येतात. अचानक झालेल्या या भयावह परिस्थितीमुळे, काय परिस्थिती त्या लोकांवर ओढवली असेल, अनेकांची भावी जीवनाची स्वप्नं ही अवघ्या काही वेळात या घटनेमुळे वाहून गेली याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत.

पहा टीझर-

या चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजु राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजु राणे यांनी चित्रपटाचं लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केलं आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे अशा उत्तम कलावंतांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं असून अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण कोंजे, दत्तात्रय गायकर, राजु राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शनचे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, अक्षय म्हात्रे आणि राजु राणे यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…
  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in