• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका मुलाच्या बापासोबत साखरपुडा प्रसिद्ध अभिनेत्रीला पडला महागात, आयुष्यभर नेसावी लागली पांढरी साडी…., कारण हैराण करणारं…

May 24, 2026 by admin Leave a Comment


मोठ्या पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारणाऱ्या सिलेब्रिटींचं खासगी आयुष्य देखील सिनेमांप्रमाणे असेल असं सर्वांना वाटतं. पण सर्वांच्याच आयुष्यात असं सुख लिहिलेलं नसतं. झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक समस्यांचा सामना केला. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. एकेकडे अभिनेत्री लग्न आणि सुखी संसाराचे स्वप्न रंगवत होती, पण नियतीने तिच्यासोबत असं काही केलं. ज्यामुळे उरलेलं संपूर्ण आयुष्य तिने एका विधवेचं आयुष्य जगावं लागलं… तर जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री, जिने एका मुलाच्या बापासोबत साखरपुडा तर केला. पण त्यांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नंदा आहे. त्याचं खरं नाव नंदिनी कर्नाटकी असं होतं. नंदा यांनी जवळपास 30 वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलं आणि 70 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नंदा यांनी शशी कपूर, राजेश खन्ना, देवानंद, जितेंद्र आणि धर्मेंद्र यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. त्याकाळी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत नंदा यांचं नाव अव्वल स्थानी होतं. नंदा प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर चढल्या, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक वेदना झेलल्या.

सांगायचं झालं तर, 70 च्या दशकात नंदा यांचं लग्न विवाहित दिग्दर्शक आणि निर्माते मनमोहन देसाई यांच्यासोबत होणार होतं. मनमोहन यांचं लग्न जीवनप्रभा यांच्यासोबत झालं होतं. त्यांना एक मुलगा देखील आहे. पण एप्रिल 1979 मध्ये जीवनप्रभा यांचं निधन झालं. दरम्यान, एका मुलाखतीत, नंदा यांचं भाऊ जयप्रकाश यांनी नंदा आणि मनमोहन यांच्या नात्याबद्दल सांगितलं. ‘नंदा आणि मनमोहन यांच्या लव्हस्टोरीमध्ये सर्वात मोठा मोलाचा वाटा वहीदा रहमान यांचा आहे. दोघांची भेट घडवून देण्यासाठी वहीदा यांनी एका डिनरची योजना केली आणि दोघांनी एकांत दिला… तेव्हा मनमोहन यांनी नंदा यांच्याकडे त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर काही दिवसांनी नंदा यांनी देखील लग्नासाठी होकार दिला…’

नंदा यांनी होकार दिल्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला. 1992 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. हा साखरपुडा अत्यंत गुपित प्रकारे झाला. पण नंदा यांच्या आयुष्यात फार मोठं संकट येणार आहे, याची त्यांनी कल्पना देखील केली नसेल. नंदा लग्नाचे स्वप्न रंगवत होते. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. 1994 मध्ये मनमोहन यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घरातील बाल्कनीमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर नंदा यांनी कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य विधवेसारखं जगण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण आयुष्य पांढरीच साडी नेसली. कारण त्यांनी मनमोहन यांना पती मानलं होतं…



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
  • Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
  • अमिताभ नाही तर या लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रेखा, ब्रेकअपनंतर विना चपल रस्त्यावर धावलेली
  • India-UAE Defence Deal : अमेरिका असमर्थ ठरली म्हणून भारताकडे आले पण भारतही तो पर्यंत UAE ला ब्रह्मोस नाही विकू शकणार
  • Ketan Agarwal Death : मला का सोडून गेलास ? केतन अग्रवालच्या हत्येनंतर अटक, सिया गोयलची भावनिक पोस्ट पुन्हा चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in