• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका माकडाची किंमत तब्बल 30 लाख, 50 हजार माकडं पाहिजेत, अचानक एवढी मागणी का वाढली?

September 7, 2026 by admin Leave a Comment


चीनमध्ये माकडांचा वापर केवळ संशोधनासाठीच होत नाही, तर ती माकडं कोट्यवधी रुपयांच्या व्यवसायाचा भाग बनले आहेत. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या माकडांची मागणी सध्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः औषधनिर्मिती आणि बायोटेक क्षेत्राच्या विस्तारामुळे माकाक माकडांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. परिणामी, त्यांच्या किमती कोविड महामारीच्या काळात नोंदवलेल्या विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये संशोधनासाठी योग्य, निरोगी आणि आवश्यक वैद्यकीय चाचण्या पूर्ण केलेल्या एका माकडाची किंमत तब्बल 2 लाख युआनपर्यंत असल्याचे सांगितलं जात आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 24 ते 30 लाख रुपयांच्या आसपास आहे. मात्र माकडांच्या किमती वाढण्यामागचं मुख कारण म्हणजे, चीनमधील वेगाने वाढणारा फार्मास्युटिकल आणि बायोटेक उद्योग.

चीन आता केवळ उत्पादन क्षेत्रातील महासत्ता राहिलेला नाही, तर नवीन औषधं आणि बायोलॉजिकल मेडिसिन विकसित करण्याच्या जागतिक स्पर्धेतही चीन अमेरिकेला कडवी टक्कर देत आहे. परिणामी, औषधांच्या संशोधनासाठी प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या माकडांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जाणून घेऊया सविस्तर..

चीनमध्ये औषध संशोधनाला एवढा वेग का आला?

गेल्या काही वर्षांत चीनने बायोटेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा परिणाम आता औषध संशोधन आणि क्लिनिकल ट्रायल्सच्या वाढत्या संख्येद्वारे दिसून येत आहे. 2025 साली चीनमध्ये 5,215 क्लिनिकल ड्रग ट्रायल्स झाल्याचं नोंदवण्यात आलं. त्यातील जवळपास 57.5 टक्के चाचण्या या नव्या औषधांशी निगडीत होत्या. विशेष म्हणजे, 2020 च्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट आहे. यावरूनच चीनमध्ये नवीन औषधांच्या संशोधनाचा वेग किती वाढलाय, याचा अंदाज येतो.

याशिवाय, जगातील मोठ्या औषध कंपन्याही चिनी बायोटेक कंपन्यांसोबत परवाना करार, संशोधन भागीदारी आणि इतर व्यावसायिक करार करत आहेत. कॅन्सर, लठ्ठपणा आणि ऑटोइम्युन आजारांसाठी नवीन उपचार आणि औषधं विकसित करण्याच्या क्षेत्रातही चीनने वेगाने प्रगती केली आहे. त्यामुळे या संशोधनासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेतील प्राण्यांची मागणी वाढणे हेही साहजिक आहे.

 

चीन में बंदरों की डिमांड हाई, एक बंदर की कीमत 30 लाख रुपए।

चीन में लैब में इस्तेमाल होने वाले मकाक बंदरों की मांग इतनी तेजी से बढ़ी है कि,

कुछ मामलों में एक स्वस्थ और रिसर्च के लिए तैयार बंदर की कीमत 2 लाख युआन ,

यानी करीब 24-30 लाख रुपये तक बताई जा रही है।

इसकी सबसे बड़ी… pic.twitter.com/pwYZsvZVZi

— Haji Nizamuddin Abbasi (@HajiNizamuddin3) September 7, 2026

माकडांची किंमत एवढी का वाढली ?

मात्र माकडांची मागणी ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत त्यांचा पुरवठा मात्र मर्यादित आहे. प्रयोगशाळेतील संशोधनासाठी योग्य असं माकाक माकड तयार होण्यासाठी साधारण चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. आधी त्याचा जन्म, मग पालन-पोषण, संगोपन, वैद्यकीय चाचण्या आणि विविध संसर्गजन्य आजारांपासून ते मुक्त आहेत ना, याची खात्री करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया केली जाते. या सर्व प्रक्रियांना वेळ लागतो. म्हणून मागणी अचानक वाढली तरी माकडांचा पुरवठा लगेच वाढवणं काही शक्य नसतं. तसंच कोविड महामारीच्या काळात परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली होती. त्या काळात चीनने प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या माकडांच्या निर्यातीवर अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या माकडांची संख्या आणखी कमी झाली.

आता बायोटेक उद्योग वेगाने विस्तारत असताना माकडांची मागणी ही त्यांच्या उपलब्धतेच्या तुलनेत खूपच वाढली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील या फरकाचा थेट परिणाम त्यांच्या किमतींवर झाला असून, माकडांची किंमत पुन्हा विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचली आहे.

उद्योगाशी संबंधित अंदाजानुसार, 2025 ते 2027 या कालावधीत चीनमध्ये दरवर्षी सुमारे 49 हजार ते 52 हजार प्रयोगशाळेतील माकड उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, चीनमधील बायोटेक आणि औषध संशोधनाचा वाढता वेग पाहता हा पुरवठा पुरेसा नसल्याचे मानलं जात आहे. त्यामुळे अनेक संशोधन संस्थांना प्रयोगशाळेसाठी आवश्यक माकड मिळवण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. एकूणच काय तर चीनमध्ये प्रयोगशाळेत असलेलं माकड हे आता फक्त वैज्ञानिक संशोधनासाठी वापरले जाणारा प्राणी असं राहिलेलं नाही. वाढती मागणी, मर्यादित पुरवठा आणि त्यासाठी लागणारा मोठा कालावधी यामुळे हे माकड आता अत्यंत मौल्यवान जैविक संसाधन बनलंय.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 40 चोरांमध्ये जीनत अमानचा डान्स, पाहून सर्वांनीच धरला होता ठेका, 46 वर्षांपासून गाणं सुपरहिट
  • Bigg Boss 20 : एकेकाळी हॉटेलमध्ये वेटर, सैफ-करीनाच्या लग्नात घासली भांडी; आज ‘या’ अभिनेत्याची सलमानच्या शोमध्ये एन्ट्री
  • Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट…
  • Feng Shui : या चार वस्तू घरात ठेवा; होईल धनाचा वर्षाव, नशीबच बदलून जाईल
  • Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in