• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘एकनाथ शिंदे हे नेहमी दिल्लीला जात असतात,पण मला वाटत नाही..,’ काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?

May 25, 2026 by admin Leave a Comment


राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आमची चर्चा झालेली आहे, सहा जणांनी आम्ही प्राथमिक चर्चा केलेली आहे. आमचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षाला दिलेला आहे. शिवसेनेने त्यांचा रिपोर्ट शिंदे साहेबांना दिला आहे. आता जागा संदर्भात महायुती मधील तिन्ही पक्ष नेते बसून चर्चा करतील आणि समन्वयाने सर्व जागांचा वाटप होईल. जळगाव आणि नाशिक तसेच संपूर्ण राज्यांमध्ये तिढा आहे, प्रत्येक पक्ष आपापल्या संख्याबळानुसार तिकीट मागत आहेत. आम्ही देखील प्रत्येक ठिकाणी भाजपसाठी तिकीट मागत आहोत आणि एक-दोन दिवसात हा तिढा सुटेल असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे हे नेहमीच दिल्लीला जात असतात. त्यांची काही इतर खाजगी कामे असतील. जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असे समजण्याचे काही कारण नाही. विधान परिषदेच्या जागांसाठी उपमुख्यमंत्री दिल्लीला जातील असे मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार हे एकत्रित बसून त्या संदर्भात निर्णय घेतील असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

एक-दोन दिवसात तिढा सुटेल

मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासाठी जागेची मागणी केलेली आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन त्या पद्धतीने जागा वाटप होईल आणि काय ते ठरेल असेही महाजन यांनी यावेळी सांगितले. नाशिक आणि जळगाव दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकत्रित बसून निर्णय घेतील. अंतिम निर्णय तिन्ही नेते एकत्र बसून आणि समन्वयाने घेतील आणि एक-दोन दिवसांमध्ये या संदर्भातला तिढा सुटेल असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

अण्णा हजारे यांनी कॉक्रोच जनता पार्टी संदर्भात युवा शक्ती ही एक राष्ट्र शक्ती आहे, जर देशातील तरुण एकत्र आले आणि जागृत झाले, तर ते देशाचे भविष्य बदलू शकतात असे म्हटले आहे. या संदर्भात विचारले असता महाजन यांनी अण्णा हजारे काय म्हणाले मला माहिती नाही. पण अण्णा हजारे यांची मी लवकरच भेट घेणार आहेत बऱ्याच दिवसांपासून माझी आणि त्यांची भेट नाही. एवढ्या एक-दोन दिवसांमध्ये आपण अण्णांची भेट घेणार आहे असे त्यांनी सांगितले.

भाजप आमदार आणि खासदारांची बैठक?

आम्ही घेतलेल्या बैठकीत कुठेही उमेदवारांच्या नावासंदर्भात आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही. आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांचं निधन झाले,त्या अंत्यसंस्कारासाठी त्यासाठी सर्व एकत्र आले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी किंवा उमेदवारीसाठी आमची कुठेही बैठक झालेली नाही असेही महाजन यांनी सांगितले.

प्रतापराव पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे का ? असे विचारता महाजन यांनी तशी अद्याप माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही किंवा तशी चर्चा देखील नाही. असो..कोणी म्हटलेलं पण नाहीए..25 ते 30 वर्षापासून जळगाव विधान परिषदेवर आमचा आमदार आहे.ही आमची सीट आहे.त्यामुळे आमचा आग्रह आहे की ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे. मात्र,उमेदवार आमचा देखील ठरलेला नाही, मात्र निश्चित ही जागा भाजपाला मिळावी त्यासाठी आम्ही आग्रही आहोत असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

पेट्रोल डिझेलची समस्या नाही, काळाबाजार

पेट्रोल डिझेलची कुठेही समस्या नाही, मात्र नागरिक पेट्रोलचा काळाबाजार करीत आहेत. अक्षरश: बाजारामध्ये प्लास्टिकचा कॅनदेखील विकत मिळत नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. काही लोक जाणून-बुजून अतिरिक्त साठा तसेच काळाबाजार करत आहेत. खरेखुरे शेतकरी सोडले तर जवळपास 80 टक्के लोक हे काळाबाजार करण्यासाठी पेट्रोल डिझेल खरेदी करीत असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Death : मला का सोडून गेलास ? केतन अग्रवालच्या हत्येनंतर अटक, सिया गोयलची भावनिक पोस्ट पुन्हा चर्चेत
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅमसाठी…
  • भाड्याच्या छोट्याशा खोलीतून आज..; 25 व्या वर्षी ‘बिग बॉस मराठी’ फेम अनुश्री मानेनं घेतलं हक्काचं घर
  • बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही’, बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
  • Uniform Civil Act : मोठी बातमी! राज्यात समान नागरी कायद्यासाठी समिती गठीत… अंमलबजावणी कधी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in