• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकतर्फी ‘मन की बात’ नको – पंतप्रधानांच्या रात्रीच्या संबोधनानंतर मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

July 24, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपर फुटीच्या मुद्यावरून देशभरात महिन्याभरापासून आंदोलन सरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशीरा याच मुद्यावरून भाष्य करत विद्यार्थ्यांना संबोधित केलं. तसेच सोशल मीडियावर एका व्हिडीओद्वारेही त्यांनी मेसेज दिला. मात्र पंतप्रधानांच्या या व्हिडीओनंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या असून थोड्याच वेळापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी या विषयावर बोलले. तर आता काँग्रेसते अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेत येण्यापूर्वी प्रधानांची हकालपट्टी करावी अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. रात्री उशीरा एकतर्फी ‘मन की बात’ करायची नसते अशा शब्दांत खर्गे यांनी टीका केली. विद्यार्थ्यांची माफी मागा , मग आम्ही चर्चा करू, असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी काल रात्री उशीरा एक व्हिडीओ ट्विट केला होता, त्यावरून आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही X वर पोस्ट करत टूीकास्त्र सोडलं.

काय आहे खर्गे यांचं ट्विट ?

संसदेचं अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांनी संसदेच्या सभागृहात निवेदन द्यायला हवं, रात्री उशिरा व्हिडिओ रेकॉर्ड करून संसदेबाहेर एकतर्फी “मन की बात” करू नये!!

@narendramodi जी,

आज संसदेत येण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवून या. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी लाठीचार्ज, काठ्यांचा वापर आणि पेलेट गन वापरण्याचे आदेश देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.

त्यानंतर आम्ही शिक्षण व्यवस्थेवर सविस्तर चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहोत – असं खर्गे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

 

जब संसद चल रही होती है तो प्रधानमंत्री को संसद के पटल पर Statement देना होता है, देर रात एक वीडियो बनाकर, संसद के बाहर एकतरफ़ा “मन की बात” नहीं करनी होती !! @narendramodi जी,

आज संसद में आने से पहले, धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त कर के आइएगा। पहले छात्रों से माफ़ी माँगिए और…

— Mallikarjun Kharge (@kharge) July 24, 2026

 

बातमी अपडेट होत आहे. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशनबाबत मोठी अपडेट समोर
  • नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
  • सावधान… नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय होणार? 72 तासात आणखी एक ग्लेशियर फुटणार? ओव्हरफ्लो सुरू
  • मुंबई पालिकेवर आता शिंदे गटाचा महापौर? मोठा बदल होण्याची शक्यता, महायुतीत काय घडतंय?
  • Sonal Dinusha: सर्वाधिक धावा आणि शतकं तरीही सोनल दिनुषासोबत अन्याय! नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in