• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकच तारीख, एकच वय आणि मृत्यूचं कारणही एक… बॉलिवूडच्या 2 जिगरी मित्रांच्या निधनानंतर रडलेला संपूर्ण देश

April 28, 2026 by admin Leave a Comment


काही योगायोग असे असतात, जे जुन्या आठवणी ताज्या करतात. पण काही आठवणी अशा देखील असतात, ज्या हैराण आणि दुःखी करतात. असंच काही बॉलिवूडच्या दोन जिगरी मित्रांसोबत झालं. ते दोन मित्र दुसरे तिसरे कोणी नाही तर, दिवंगत अभिनेते फिरोज खान आणि विनोद खन्ना आहेत. दोघांचं निधन एकाच तारखेला, एकाच वयात आणि एकाच कारणामुळे झालं. फिरोज खान आणि विनोद खन्ना यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण दोघांच्या निधनानंतर संपूर्ण जग रडलेलं.

आपल्या पिढीतील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विनोद खन्ना यांचं निधन, चित्रपटसृष्टीतील त्यांचे सर्वात जवळचे मित्र फिरोज खान यांच्या निधनाच्या आठ वर्षांनंतर त्याच दिवशी झालं. मृत्यूच्या वेळी दोघांचंही वय सारखंच होतं आणि ते दोघेही कर्करोग या एकाच आजाराने ग्रस्त होते. विनोद खन्ना आणि फिरोज खान यांचं 27 एप्रिल रोजी वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं.

वाईट काळात फिरोज खान यांनी दिली साथ

विनोद खन्ना यांच्यानंतर अमिताब बच्चन दुसरे लोकप्रिय अभिनेते होते. अशात विनोद खन्ना यांनी बॉलिवूडला निरोप दिला. एका मुलाखतीत विनोद खन्ना म्हटले होते, जगाला त्याच्यानुसार चालू देणं योग्य आहे… पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
अनेक वर्ष विनोद खन्ना ओशोंच्या आश्रमात राहिले. ज्यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. अशात पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी फिरोज खान यांनी विनोद खन्ना मोठी मदत केली. ‘दयावान’ सिनेमातून विनोद खन्ना यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

फिरोज यांच्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यू होईपर्यंत दोघे आयुष्यभर मित्र राहिले. फिरोज यांच्या निधनाच्या काही दिवस आधी, विनोद यांनी अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत मुंबईतील रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली, तेव्हा रुग्णालयात दोघेही खूप रडले. योगायोगाने, आठ वर्षांनंतर, जेव्हा विनोद यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झालं, तेव्हा त्याच दिवशी विनोद खन्ना यांचं देखील निधन झालं. 27 एप्रिल रोजी, विनोद यांनी अखेरचा श्वास घेतला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीसीसीआयच्या क्रिकेट ॲकॅडमींचं उद्घाटन, फोटो पाहिलेत?
  • प्रेशर कुकर वापरताना करताय ‘या’ 5 चुका, इशारा ओळखा, नाहीतर जीव येऊ शकतो धोक्यात!
  • गोविंदाचं करिअर का बर्बाद झालं? अश्विनी कौशलने सांगितलं कारण, ऐकून तुम्हाला देखील बसेल धक्का
  • वैभव सूर्यवंशी स्टार होऊ शकतो पण…मनू भाकरच्या विधानाने नव्या वादाला तोंड; सोशल मीडियावर तुफान!
  • मनाची शांती उत्तम पण…, असं काय बोलून गेली काजोल? पोस्ट सर्वत्र व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in