• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उर्मिला मातोंडकर यांचा पूर्व पती मोहसिन अख्तर याने केले दुसरे लग्न, शेअर केले सुंदर फोटो

June 14, 2026 by admin Leave a Comment


रंगीला गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री म्हणून ‘रंगीला’ चित्रपटाने एका रात्रीत स्टार झालेल्या उर्मिला मातोंडकर या ‘मासूम’ चित्रपटातून सर्वात आधी बालकलाकार म्हणून समोर आल्या होत्या. उर्मिला मातोंडकर यांनी राजकारणात प्रवेश करीत राजकीय भूमिका देखील साकारली आहे. मात्र, उर्मिला हीने काही वर्षांपूर्वी मॉडेल मोहसिन अख्तर मीर या आपला जीवनसाथी निवडल्याने पुन्हा चर्चेत आली होती. आता उर्मिला मातोंडकर यांना तलाक देणारा त्यांचा पूर्व पती मोहसिन अख्तर मीर याने पुन्हा दुसरे लग्न केले आहे. मोहसिन यानी या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीर यांचे नाते चर्चेचा विषय ठरले होते. त्यांनी २०१६ मध्ये लग्न केले आणि चाहते आश्चर्यचकीत झाले. मात्र, कालांतराने त्यांच्या तलाक झाले आणि त्यांचे हे सुंदर नाते संपुष्टात आले. आता, दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर दोन वर्षांनी, मोहसिन हा पुन्हा बोहल्यावर चढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहसिन अख्तर मीर याने निधा भट्ट हीच्या निकाह केला आहे. त्याने या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

चाहत्यांकडून अभिनंदन

लग्नाच्या फोटोसोबतच मोहसिन याने एक कॅप्शन लिहिली आहे. त्यात चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्याने आपल्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला आणि ज्यांनी आपल्याला नेहमी पाठिंबा देणाऱ्यांचे आभारी आहोत. मोहसिन याने शेअर केलेले या फोटोत लग्नाचे विधी दिसत आहेत.चाहत्यांनी आणि मित्रांनी आयुष्याच्या नव्या सुरुवातीबद्दल उभयंताचे अभिनंदन केले. सोशल मीडियावरील मोहसिन आणि त्याची पत्नी निधा भट्ट या दोघांच्या फोटोवर लोक शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेक युजर्सने कमेंट करुन त्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

येथे पाहा फोटो –

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohsin Akhtar (@mohsinakh)

मोहसिन अख्तर ओळख मिळाली

मोहसिन अख्तर मीर हा एक मॉडेल आणि अभिनेता आहे. मात्र, त्याला खरी ओळख उर्मिला मातोंडकर सोबतच्या नात्यामुळे मिळाली. या दोघांच्या घटस्फोटानंतर, त्याने आपले वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवले. त्यामुळे, त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. उर्मिला मातोंडकर अनेक काळापासून चित्रपट आणि राजकारण सक्रिय आहेत. त्यांच्या घटस्फोटानंतर, त्यांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी सार्वजनिक विधाने केलेली नाहीत. आता मोहसिन याच्या दुसऱ्या विवाहामुळे त्यांचे नावे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in