• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उर्मिला मातोंडकरच्या पूर्व पतीचं दुसरं लग्न; निधा भट्ट आहे तरी कोण?

June 15, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काश्मिरी बिझनेसमन मोहसिन अख्तरशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. 2024 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. आता घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर मोहसिनने दुसरं लग्न केलं आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काश्मिरी बिझनेसमन मोहसिन अख्तरशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. 2024 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. आता घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर मोहसिनने दुसरं लग्न केलं आहे.

मोहसिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निधा भट्टसोबतच्या निकाहचे खास फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहिल्यापासून निधा भट्ट आहे तरी कोण असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट असल्याने नेटकऱ्यांना त्यावरूनही काहीच माहिती किंवा फोटो मिळाले नाहीत.

मोहसिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निधा भट्टसोबतच्या निकाहचे खास फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहिल्यापासून निधा भट्ट आहे तरी कोण, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट असल्याने नेटकऱ्यांना त्यावरूनही काहीच माहिती किंवा फोटो मिळाले नाहीत.

निधाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आतापर्यंत 154 पोस्ट असून तिचे 1139 जण फॉलोअर्स आहेत. तर निधा स्वत: 264 लोकांना इन्स्टावर फॉलो करते. निधाच्या बायोमध्ये उर्दूमध्ये लिहिलंय 'देवाचे आभार सर्व काही ठीक आहे.' यामध्ये तिने तिची राशी वृषभ असल्याचंही लिहिलं आहे. केवळ इन्स्टाग्रामच नाही तर निधाचं फेसबुक अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट आहे. निधा ही जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर इथली आहे.

निधाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आतापर्यंत 154 पोस्ट असून तिचे 1139 जण फॉलोअर्स आहेत. तर निधा स्वत: 264 लोकांना इन्स्टावर फॉलो करते. निधाच्या बायोमध्ये उर्दूमध्ये लिहिलंय, 'देवाचे आभार, सर्व काही ठीक आहे.' यामध्ये तिने तिची राशी वृषभ असल्याचंही लिहिलं आहे. केवळ इन्स्टाग्रामच नाही तर निधाचं फेसबुक अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट आहे. निधा ही जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर इथली आहे.

मोहसिनने याआधी उर्मिला मातोंडकरशी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर होतं. घटस्फोटापूर्वी बऱ्याच काळापासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या होत्या. मोहसिन आणि निधा यांची भेट कधी आणि कशी झाली निधाचा पेशा काय आहे याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.

मोहसिनने याआधी उर्मिला मातोंडकरशी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर होतं. घटस्फोटापूर्वी बऱ्याच काळापासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या होत्या. मोहसिन आणि निधा यांची भेट कधी आणि कशी झाली, निधाचा पेशा काय आहे याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.

मोहसिन अख्तर आणि उर्मिला मातोंडकर यांनी 4 फेब्रुवारी 2016 रोजी एका खाजगी समारंभात लग्न केलं होतं. आंतरधर्मीय आणि वयातील दहा वर्षांच्या फरकामुळे त्यावेळी हे लग्न चर्चेत आलं होतं. 2014 मध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात या दोघांची पहिली भेट झाली होती.

मोहसिन अख्तर आणि उर्मिला मातोंडकर यांनी 4 फेब्रुवारी 2016 रोजी एका खाजगी समारंभात लग्न केलं होतं. आंतरधर्मीय आणि वयातील दहा वर्षांच्या फरकामुळे त्यावेळी हे लग्न चर्चेत आलं होतं. 2014 मध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात या दोघांची पहिली भेट झाली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in