• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उर्मिला मातोंडकरच्या पूर्व पतीने घटस्फोटानंतर थाटला दुसरा संसार, कोण आहे अभिनेत्रीची सवत? 1 फोटो सर्वत्र व्हायरल

June 12, 2026 by admin Leave a Comment


गेल्या अनेक वर्षांपासून दूर बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. पण आता उर्मिला नाही तर, अभिनेत्रीचा पू्र्व पती त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कारण उर्मिला हिला घटस्फोट दिल्यानंतर त्याने दुसरा संसार थाटला आहे. सध्या अभिनेत्रीच्या पूर्व पतीच्या लग्नाचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो त्याने स्वतः सोशल मीडियावर इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. उर्मिला हिच्या पूर्व पतीचं नाव मोहसिन अख्तर मीर असं आहे. उर्मिला हिला घटस्फोट दिल्यानंतर मोहसिन याने दुसऱ्यांदा संसार थाटला आहे.

उर्मिला आणि मोहसिन यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला आणि मोहसिन यांच्या नात्यात वादळ आलं आमि दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि 2024 मध्ये कायमचे विभक्त झाले.

घटस्फोटाच्या जवळपास दीड वर्षांनंतर मोहसिन याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. मोहसिन याने दुसरं लग्न केलं आहे. मोहसिन याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये मोहसिन याने एका महिलेचा हात पकडला आहे. फोटोमध्ये मेस्ट्री गर्लच्या हातावर नव्या नवरीसारखी मेहेंदी दिसत आहे. शिवाय फोटोमध्ये दोघांची डायमंड रिंग देखील दिसत आहे… फोटो व्हायरल झाल्यानंतर मोहसिन याच्या आयुष्यातील मेस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे.

मोहसिन याने फोटोमध्ये तिचा चेहरा दाखलेला नाही किंवा तिचं नाव काय आहे, हे देखील सांगितलेलं नाही. त्यामुळे फोटोमध्ये दिसणारी महिला कोण आहे. याबद्दल कोणतीही अपडेट अद्याप समोर आलेली नाही. पण फोटो समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सांगायचं झालं तर, उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि मोहसिन अख्तर मीर (Mohsin Akhtar Mir) यांचं लग्न खास पाहुण्यांच्या उपस्थित पार पडलं.  पण जेव्हा मोहसिन आणि उर्मिला यांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो केलं तेव्हा दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. घटस्फोटानंतर उर्मिला एकटीच आयुष्य जगत आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in