• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्या रविवारी मध्य आणि हार्बरमार्गावर मेगाब्लॉक, २९ मेपासून सीएसएमटीत १० दिवस ब्लॉक

May 23, 2026 by admin Leave a Comment


मध्य रेल्वेने रविवार २४ मे २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय मार्गांवर खालीलप्रमाणे मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल गाड्यांच्या वाहतूकीवर परिणाम होणार आहे. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील उपनगरी लोकल गाड्या विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबा घेणार नाहीत.

मेन लाईन:

माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल ट्रेन शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबा घेतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीराने गंतव्य स्थानकांवर पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल ट्रेन मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरुन वळवण्यात येतील. या लोकल गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबा घेतील आणि पुढे माटुंगा स्थानकावरून पुन्हा अप धिम्या मार्गावरुन वळवण्यात येतील. त्यामुळे त्या नियोजित वेळेपेक्षा या लोकल १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील उपनगरी लोकल गाड्या विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन मार्गावरील सेवा नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्गावरील लोकल रद्द –

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– चुनाभट्टी- वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि
चुनाभट्टी- वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी-बेलापूर-पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत सुटणाऱ्या वांद्रे -गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील.

पनवेल-बेलापूर-वाशी येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची अप हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत आणि गोरेगाव- वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची अप हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द राहतील.

दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालवण्यात येईल. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

सीएसएमटीत १० दिवस ब्लॉक, अनेक एक्सप्रेस ठाणे ते दादरपर्यंतच

छत्रपती शिवाजी (सीएसएमटी) महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक १६ आणि १७ वर सुरू असलेला ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी १० दिवस वाढविण्यात आला आहे. या काळात काही मेल-एक्स्प्रेस गाड्या सीएसएमटीपर्यंत न जाता दादर आणि ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहेत.सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी रेल्वे लँड डेव्हलपमेंट एथॉरिटीमार्फत विविध कामे सुरू आहेत. २९ मे २०२६ पासून पुढील १० दिवस सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना दादर किंवा ठाणे स्थानकावर उतरून पुढील प्रवास लोकलने करावा लागणार आहे. १२११२ अमरावती एक्स्प्रेस, ११००२ नंदीग्राम एक्स्प्रेस, १२८१० हावडा एक्स्प्रेस, ११०२० कोणार्क एक्स्प्रेस, २२१४४ बीदर एक्स्प्रेस, २२१०८ लातूर एक्स्प्रेस, २२१२० मडगाव तेजस एक्स्प्रेस या गाड्या दादरपर्यंत धावणार आहेत, तर १२१३४ मंगळूर एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत धावणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
  • Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर…
  • Viral Video : रेवती सुळेच्या लग्नात संजय राऊत – जया बच्चन यांचा मराठीत संवाद, बिग बी पहातच राहिले…
  • बंडखोर खासदारांवरील बडतर्फची कारवाई टळली? एकनाथ शिंदेंच्या त्या खेळीने उद्धव ठाकरेंना मोठा झटका
  • बाळासाहेब ठाकरेंची किरण पावसकरांकडून खिल्ली, आता एकनाथ शिंदे कारवाई करणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in