• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार, मोदी सरकार विरोधात शिवसेना मैदानात

July 21, 2026 by admin Leave a Comment


गेल्या दोन दिवसांपासून जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीने जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तरुणांनी जंतरमंतर दणाणून सोडलं आहे. पोलिसांनी आंदोलकांवर जोरदार लाठीमार केल्याने हे आंदोलन अधिकच चिघळलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील बडे नेते जंतरमंतरवर येत असून तरुणांना साथ देत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा उद्या जंतरमंतरवर जाणार आहेत. त्यामुळे ठाकरे उद्या दिल्लीत जाऊन काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काल झालेल्या आंदोलनानंतर आज अनेक नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दीपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारचा जोरदार निषेध केला. तसेच हे सरकार विद्यार्थ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे जंतरमंतरवर जाणार आहेत. आदित्य ठाकरेही सोबत असणार असल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे उद्या आंदोलकांना पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काल हिंसक वळण, आज धरपकड

कॉकरोच जनता पार्टीच्या कालच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले होते. पोलिसांनी अमानूषपणे आंदोलकांवर लाठीमार केला. त्यानंतर आंदोलकांना जंतरमंतरवरून पांगवण्यात आलं होतं. मात्र, रात्री आंदोलकांनी पुन्हा जंतरमंतरवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. आज सकाळपासूनच आंदोलक अधिकच आक्रमक होऊन आंदोलन करत होते. त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

नेत्यांची रीघ

आज दुपारनंतर देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलकांची विचारपूस केली. तसेच आंदोलकांना पाठिंबाही दिला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी तर मोदींच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केल्याने वातावरण अधिकच तापलं. आंदोलकांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धारलं. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही दीपके यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच काही मदत हवी का? अशी विचारणा शरद पवार यांनी केली. तर संध्याकाळच्या सुमारास माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दीपकेंची भेट घेऊन आंदोलकांना संबोधित केलं. यावेळी केजरीवाल यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदवला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विविधेतील एकता हाच भारताच आत्मा, सरसंघचालक मोहन भागवतांचा अमेरिकेतून संदेश, धर्माबाबत मोठे चिंतन
  • Petrol Diesel Price Today : 115 रूपये पेट्रोल, 104 डिझेल, तेलाच्या किमतीत मोठे बदल..
  • शिंदे गटात खळबळ, सर्व मंत्री, आमदार घाबरले; कोर्टाच्या आगामी निकालावरून बड्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
  • 9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
  • किचनमध्ये जाताच राग येतोय, चिडचीड होतेय? वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in