• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी, थेट नियम सांगितला, मुंबईतील आंदोलनावर आक्षेप!

July 19, 2026 by admin Leave a Comment


Uddhav Thackeray Protest : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. गेल्या 21 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणारे सोनम वांगचूक अन्नत्याग आंदोलन करत होते. आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयातही त्यांचे आंदोलन सुरूच आहे. दुसरीकडे जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनीदेखील आपले उपोषण सुरू केले आहे. सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके या दोघांच्याही आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दिवसेंदिवस हा पाठिंबा वाढत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याच पाठिंब्यासाठी ठाकरेंच्या पक्षाने आज (19 जुलै) मुंबईत आंदोलन पुकारले आहे. त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, आता ठाकरेंच्या या आंदोलनावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ठाकरेंचे आंदोलन बेकायदेशीर आहे, ठाकरे बेकायदेशीर ठिकाणी आंदोलनक रत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

तिथे आंदोलन करायला कायदेशीर बंदी आहे

उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाआधी गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ठाकरेंनी आंदोलनासाठी निवडलेले ठिकाण हे बेकायदेशीर असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आंदोलनासठी जे ठिकाण निवडले आहे तिथे आंदोलन करता येत नाही. तिथे आंदोलन करायला कायदेशीर बंदी आहे. आझाद मैदानाशिवाय अन्य टिकाणी आंदोलनाला परवानागी नाही, असा दावा सदावर्ते यांनी केला.

आपले वर्तन कायदेशीर असले पाहिजे

तसेच, शिवाजी पार्क पोलिसांना मी फोन लावला. माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ठाकरेंना आंदोलनाची परवानगी दिलेली नाही.  आपले वर्तन कायदेशीर असले पाहिजे. शिवाजी पार्क हा सायलेन्स झोन आहे. तुमच्या राजकारणासाठी लोकांची शांतते भंग करणे हे बेकायदेशीर आहे, असा हल्लाबोल करत त्यांनी पोलीस आयुक्तांनी या आंदोलनावर तातडीने कारवाई केली पाहिजे, अशी माणी केली.

मी पोलिसांना पत्र दिले

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी सुधा बेकायदा ठिकाणी आंदोलनं केली आहेत.  त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल. ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत. पोलिसांनी गांभीर्यपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मी पोलिसांना पत्र दिले आहे. पोलिस आयुक्तांना आणि वरिष्ठ निरीक्षकांना पत्र दिले आहे.  कोणतीही जागा किंवा मैदान प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय वापरता येत नाही. त्यांच्यावर कलम २२३, २९१,२९२, १९६ अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, असेही यावेळी सदावर्ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी संविधानाचा अभ्यास करा, प्रोटोकॉलनुसार…मोदींच्या फोटोवरून कृष्णराज महाडिकांनी अमित ठाकरेंना सुनावलं!
  • ऑपरेशन करण्यापूर्वी इथे डॉक्टर सर्वातआधी रुग्णांची जात विचारतात, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
  • 38 वर्षांपासून कोर्चात ससेहोलपट, आरोपी गेला तो आलाच नाही; पण वृद्ध पोलिसांचे प्रचंड हाल, साताऱ्याच्या खटल्याची देशात चर्चा
  • Ola ने लॉन्च केली नवीन स्कूटर, एका चार्जमध्ये धावणार 301 किमी, किंमत फक्त…
  • Eknath Shinde : हे तर मोठं दुर्दैव, बाळासाहेबांना धनुष्यबाण…सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच शिंदेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in