• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्धव ठाकरेंपुढे आणखी मोठं संकट, आता आमदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ!

June 18, 2026 by admin Leave a Comment


Bacchu Kadu On UBT Split : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एकूण सहा खासदारांनी मोठं बंड केलं आहे. शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनी हे खासदार आपला गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन करण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या संसदीय गटाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वच खासदारांनी उपस्थित राहावे, असा आदेश व्हीपच्या माध्यमातून देण्यात आला होता. परंतु या बैठकीला एकूण सहा खासदार अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून या बंडखोर सहा खासदारांची खासदारकी जावी यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जातोय. दुसरीकडे सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच मग बंडखोर खासदारांची नावे आणि त्यांचा शिंदे गटातील प्रवेश जाहीर करायचा, अशी भूमिका शिंदे यांच्या पक्षाने घेतलेली आहे. दरम्यान, या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. याबाबतचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी ठाकरे गटातील पक्षफुटीवर प्रतिक्रिया दिली. ते वाशिममध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. शिंदे सेने कडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर खासदाराच्या मागे आता आमदारही येणार आहेत, असा दावा बच्चू कडू यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांचा, मजुरांचा, दिव्यांगाचा नेता म्हणून आम्ही शिंदे साहेबांकडे पाहतो आहे, अशा भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

त्यांच्या मोहात पडणारे भरपूर लोक

लोक एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या प्रेमात पडले आहेत. मीही त्यांच्या मोहात पडलो आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीला आमचा सलाम आहे. म्हणून तर आम्ही त्यांच्या सोबत गेलो. त्यांच्या मोहात पडणारे भरपूर लोक आहेत, असे व्यक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. दरम्यान, सध्यातरी ठाकरे यांचे खासदार फुटले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता भविष्यात आमदारही बंड करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in