• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उंचीनुसार किती हवं वजन? डॉक्टरने सांगितलं एकदम सोप्पं गणित

May 26, 2026 by admin Leave a Comment


Ideal Weight by Height: सध्या शरीराच्या वाढत्या घेरामुळे अनेक जण परेशान आहेत. त्यांना फिट बॉडी हवी आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण आटापिटा करत आहेत. पण तुमच्या उंचीनुसार किती वजन हवे हे अनेकांना माहिती नसते. त्याविषयीची माहिती नसते. अनेकजण स्वतःला ओव्हरवेट मानतात. केवळ वजन मोजणे पुरेशे नसते. तर उंचीनुसार वजनाला महत्त्व असते. तज्ज्ञांच्या मते आदर्श वजन (Ideal Weight) माहिती असणे आवश्यक आहे. योग्य वजनामुळे तुमचे फिटनेस, हृदयाची मजबुती, रक्तदाब, मधुमेह, सांध्यावरील वजन याची माहिती, अंदाज मिळतो.

उंचीनुसार किती हवे वजने?

तज्ज्ञांच्या मते, जर उंचीनुसार, वजन कमी आणि जास्त असेल (Why is Weight Important in Relation to Height?) तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. अधिक वजन असेल त्याचा परिणाम वजन, फॅटी लिव्हर, हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. कमी वजन असेल तर कमजोरी, थकवा आणि रोग प्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन संतुलित असणे आवश्यक आहे. आदर्श वजनापेक्षा अधिक वजन असेल तर धाप लागणे अथवा इतर आजार बळवण्याची शक्यता आहे.

BMI काय आहे, का असते महत्त्वाचे

उंचीनुसार वजन किती आहे याचे मोजमाप, त्याचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी BMI (Body Mass Index) हे योग्य मापक मानल्या जाते. त्यानुसार वजन आणि उंची यानुसार व्यक्ती वजनदार आहे की कमी वजनाची हे समोर येते. महिलांचे वजन पुरुषांपेक्षा कमी असते. कारण त्यांची शारीरिक रचना वेगळी असते.

BMI मोजण्यासाठी कोणता फॉर्म्युला?

BMI = वजन (किलो) भागिले (उंची मीटर मध्ये × उंची मीटरमध्ये)

BMI नुसार वजनाची श्रेणी

18.5 पेक्षा कमी – कमी वजनी

18.5 ते 24.9 -साधारण वजन

25 ते 29.9 – जाड

30 पेक्षा अधिक – लठ्ठपणा

वजनानुसार आदर्श वजन किती? (Ideal Weight According to Height)

5 फूट (152 सेमी) – 45 ते 55 किलो

5 फूट 3 इंच (160 सेमी)- 50 ते 60 किलो

5 फूट 6 इंच (168 सेमी) – 55 ते 67 किलो

5 फूट 9 इंच (175 सेमी) – 62 ते 75 किलो

6 फूट (183 सेमी) – 68 ते 85 किलो



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : विकासनिधीवरुन सरकारवर होणारा मोठा आरोप स्वत: राऊतांनीच काढला खोडून
  • आमदार व्हायचंय? काळजी करू नका, देवाभाऊकडे दैवीशक्ती आहे… बड्या मंत्र्याचं मोठं विधान
  • उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांबद्दल धक्कादायक माहिती, थेट फाटला बुरखा..
  • ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच…
  • उमरग्यात येऊन माफी मागा… ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in