• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इन्स्पेक्टरची मुलगी आहे, छापा टाकला तर थेट..; कोणावर भडकली ‘तारक मेहता..’ची अभिनेत्री?

April 16, 2026 by admin Leave a Comment


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. जेठालाल, दयाबेन, बबिता, टप्पू, माधवी भिडे, अंजली भाभी.. या भूमिका साकारणारे कलाकार घराघरात पोहोचले आहेत. या मालिकेत अभिनेत्री नेहा मेहताने अंजली भाभीची भूमिका साकारली होती. परंतु काही वर्षांनंतर तिने ही मालिका सोडली. सध्या ती ‘इत्ती सी खुशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांत नेहाचा लूकसुद्धा बदलला आहे. अशातच सोशल मीडियावरील फेक आयडीमुळे ती चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या नावाने फेक आयडी चालवणाऱ्यांना तिने थेट इशारा दिला आहे.

‘बजोका स्पॉटलाइट’ला दिलेल्या मुलाखतीत नेहाने सांगितलं की अनेकजण तिच्या नावाने सोशल मीडियावर फेक (बनावट) आयडी चालवत आहेत. माझ्याशी पंगा घेऊ नका, तुमची हालत खराब करून टाकेन, अशा शब्दांत तिने लोकांना इशारा दिला आहे. या मुलाखतीत नेहाला विचारण्यात आलं होतं की, तुला रील आवडतात की अल्बम? त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “रीलपर्यंत तर मी पोहोचले नाही. सोशल मीडियावर पाहिलंत तर माझ्यापेक्षा जास्त माझे फेक आयडी आणि फॅन आयडी आहेत. काय काय बनवले आहेत काय माहीत? लोक माझ्या नावाने लाखो रुपये कमावत आहेत. ज्यादिवशी छापा पडेल ना.. इन्स्पेक्टरची मुलगी आहे, ज्यादिवशी छापा टाकेन त्यादिवशी सर्वांची हालत खराब होईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha K Mehta (@mehta.neha.sk)

नेहा मेहताने दिलेली ही प्रतिक्रिया चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे चाहते त्यांच्या नावाने अनेक फॅन पेजेस किंवा अकाऊंट्स चालवतात. त्यातून त्यांची कमाईसुद्धा होत असते. बरेच फेक अकाऊंट्ससुद्धा क्रिएट केले जातात. यावरूनच नेहा मेहताने ही प्रतिक्रिया दिली आहे. नेहान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडल्यानंतर कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. जवळपास पाच वर्षांनंतर ती पुन्हा टीव्ही मालिकेत परतली आहे. ‘इत्ती सी खुशी’ या मालिकेतून तिने कमबॅक केलं असून तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vinod Kambli | मागचं पुढचं काहीच आठवेना… माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; ब्रेन स्ट्रोकचा धोका
  • फक्त 3 कोटींचं बजेट अन् 450% चा तगडा नफा; सनी देओलच्या या चित्रपटाने बदललेली सर्वच गणितं
  • प्रॉपर्टी टॅक्सचे खास गणित, तुमच्या घराचा कर कसा ठरवला जातो? जाणून घ्या फॉर्म्युला
  • US-Iran War : होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव स्फोटक, अमेरिकेची नाकेबंदी, इराणचा इशारा – होर्मुझ पेटणार ?
  • tv9 Marathi Special Report | महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in