• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इतरांच्या मुलाला जो न्याय… पद वाटपाबाबतच्या वक्तव्यानंतर आक्रमक भुजबळांचं घुमजाव? आता भूमिका काय?

June 10, 2026 by admin Leave a Comment


Chhagan Bhujbal Big Statements: पक्षातील इतरांना जो न्याय मिळाला, इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत. इकडे त्यांची मुलबाळं मंत्री आहेत. मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवेळी केला होता. पुतण्या समीर भुजबळ यांना त्यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्याची भूमिका मांडली होती. पण राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना देण्यात आली. पक्षातील पद वाटपाबाबत भुजबळांनी यापूर्वी नाराजी जाहीर केली होती. त्यांनी आता या भूमिकेवरून घुमजाव केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त कार्यक्रमानंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.

मोडून तोडून माझं वक्तव्य सांगू नका

छगन भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक होते. त्याचवेळी त्यांनी पक्षातील काही नेत्यांच्या घरात तीन, दोन पदं असल्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आता भूमिका बदलली आहे. आज माध्यमांशी बोलताना, “मोडून तोडून माझं वक्तव्य सांगू नका. मी आधी बोललो काही जण कष्ट करु पुढे आलेत. अजित पवार सोडून गेलेत त्यानंतर सुनेत्रा ताई पुढे आल्या आहेत. अनेकांना वाटतं आम्हाला दिलं नाही. प्रत्येकाने काम करत राहिले पाहिजे पदं कमी असतात. पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचे काम करत असतो. एकजुटीने काम करत राहावे असं सांगतो.” अशी भूमिका भुजबळ यांनी जाहीर केली.

मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही

समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात न घेतल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. तुमच्यावर अन्याय झाला का असा सवाल त्यांना काल करण्यात आला होता. त्यावेळी “अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल, कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे. मैं कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हूं.” अशी स्पष्ट नाराजी भुजबळांनी व्यक्त केली होती. तर आता त्यांनी या वक्तव्यापासून फारकत घेतल्याचे दिसून येते.

त्या प्रकरणाशी माझा संबंध नाही

गिरगावमधील एका जागेप्रकरणात मालकाला भेटण्यासाठी मंत्र्यांच्या आवारातील पत्त्यावर नोटीस देऊन जाहीर निमंत्रण दिल्याचे समोर आले. या विषयीची चर्चा रंगल्यानंतर सदर विकासकाशी अथवा जाहिरातीशी आपला कसलाही संबंध नसल्याचे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले. हा प्रकार गंभीर असून याबाबत मलबार हिल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली होती.

तर आज माध्यमांशी बोलताना त्यांनी याप्रकरणी माहिती दिली. त्या माणसाला पकडलं असे ते म्हणाले. या ठिकाणी धोबी समाजाचा आमचा एक बांधव राहातो. नवीन वकील तो मुलगा झाला आहे. जाहिरात ते आणि बंगल्याचा त्याने पत्ता टाकला. पोलिस त्यांना घेऊन गेलेत. बंगल्यात अनेक सेवक राहात असतात. त्यांचे मुलं राहात असतात काम करत असतातय. अशात, पोलिस आलेत तपासणी केली आणि त्यांना घेऊन गेलेत. त्याचा आणि आमचा काही संबंध नाही, असे भुजबळ म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in