
ओटीटी आणि वेब सीरिजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मनोरंजन क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. प्रेक्षक आता आपल्या सोयीनुसार कोणत्याही वेळी आवडती मालिका पाहू शकतात. अशा परिस्थितीत जगभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे Game of Thrones.
17 एप्रिल 2011 रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वेस यांनी तयार केली आहे. यामध्ये जगातील विविध राजघराण्यांमधील सत्तासंघर्ष, राजकारण, विश्वासघात आणि जादुई शक्ती यांचे प्रभावी चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे.
‘गेम ऑफ थ्रोन्स’चे एकूण 8 सीझन आणि 74 भाग आहेत. प्रत्येक भागाचा कालावधी सुमारे 50 ते 82 मिनिटांचा असून तो प्रेक्षकांना चित्रपटासारखा अनुभव देतो. IMDb वर या मालिकेला 10 पैकी 9.2 इतके उच्च रेटिंग मिळाले आहे.
उत्कृष्ट कथानक, भव्य निर्मिती आणि दमदार अभिनयामुळे या मालिकेने जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली असून अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही जिंकले आहेत. भारतातही या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे.
ही मालिका हिंदीसह विविध भाषांमध्ये JioHotstar वर उपलब्ध आहे. प्रदर्शित होऊन जवळपास 15 वर्षे उलटूनही ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची लोकप्रियता कायम असून आजही ती जगातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या मालिकांपैकी एक मानली जाते.




Leave a Reply