• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंडस्ट्रीने बंदी घातलाच रणवीर सिंहचे होणार कोट्यवधीचे नुकसान? आकडा पाहून बसेल धक्का

May 26, 2026 by admin Leave a Comment


रणवीर सिंह सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या बहुचर्चित ‘डॉन 3’ चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळे आता त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज अर्थात FWICE ने रणवीर सिंहवर तात्पुरता बॅन जाहीर केला असून हा वाद मिटेपर्यंत तो कोणत्याही नवीन चित्रपटाचे शूटिंग करू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

बॅनची घोषणा झाल्यानंतर रणवीर सिंह उशिरा रात्री मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी त्याने पांढरा कुर्ता-पायजमा, काळे जॅकेट आणि बांधलेले लांब केस असा साधा लूक ठेवला होता. त्याच्यासोबत काही अन्य कलाकारही दिसल्याने ‘धुरंधर 3’च्या शूटिंगच्या चर्चांना उधाण आले. मात्र अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या कुटुंबासोबत दिसल्याने तो सुट्टीसाठी रवाना झाल्याचे स्पष्ट झाले.

‘डॉन 3’ सोडल्याने निर्माण झाला वाद

2023 मध्ये ‘डॉन 3’ची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले होते. मात्र ‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीरने अचानक हा प्रोजेक्ट सोडल्याचा आरोप करण्यात आला. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे त्यांचे जवळपास 45 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

सुरुवातीला ही तक्रार प्रोड्यूसर्स गिल्डकडे करण्यात आली. त्यानंतर प्रकरण FWICE कडे पोहोचले. फेडरेशनने रणवीर सिंहला तीन वेळा नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र रणवीरच्या टीमने हे प्रकरण कायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयातूनच तोडगा निघायला हवा असे स्पष्ट केले. यानंतर सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन FWICE ने रणवीर सिंहविरोधात असहकार आणि बॅनची घोषणा केली.

FWICE च्या बॅनचा नेमका परिणाम काय?

FWICE ने एखाद्या कलाकाराविरोधात असहकार जाहीर केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण सेटवर काम करणारे बहुसंख्य तंत्रज्ञ आणि कर्मचारी हे फेडरेशनशी संलग्न असतात. जर फेडरेशनने सदस्यांना रणवीरसोबत काम न करण्याचे निर्देश दिले तर त्याच्या चित्रपटांचे शूटिंग थांबू शकते. त्यामुळे निर्मात्यांनाही मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

रणवीर सिंहच्या आगामी चित्रपटांमध्ये दिग्दर्शक आदित्य धर यांचा मोठा प्रोजेक्ट, प्रलय, बैजू बावरा आणि सिम्बा 2 यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांच्या शूटिंगवर आता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्मात्यांना शूटिंग सुरू करण्यापूर्वी FWICE कडून NOC घ्यावी लागू शकते. त्यामुळे जर हा वाद दीर्घकाळ सुरू राहिला, तर त्याला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. रिपोर्टनुसार, आगामी प्रोजेक्ट्स थांबल्यास किंवा पुढे ढकलल्यास रणवीर सिंहला त्याच्या फी आणि ब्रँड व्हॅल्यूच्या स्वरूपात तब्बल 150 ते 200 कोटी रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागू शकते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन!
  • मोठी बातमी! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना पदावरून हटवलं, आता नव्या अधिकाऱ्याकडे कार्यभार
  • Skoda च्या ‘या’ SUV चा भारतात धुमाकूळ; 5 वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून रचला इतिहास
  • WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!
  • वेगन डाएट : घरच्या घरी सोया मिल्क बनवायचे आहे ? ही रेसिपी येईल कामी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in