• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंजिनिअर मुलींना प्रसाद म्हणून दूध प्यायला द्यायचा, मग..मथुरेतल्या अशोक खरातचे धक्कादायक कारनामे

June 5, 2026 by admin Leave a Comment


काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने हादरवून सोडलं होतं. आता तसचं एक प्रकरण मथुरेत उघड झालं आहे. या प्रकरणी अभिषेक मिश्रा या आरोपीला अटक झाली आहे. महत्वाचं म्हणजे अभिषेकचं शिक्षण IIT सारख्या उच्च संस्थेतून झालं होतं. अभिषेक 29 वर्षांचा आहे. अध्यात्मिकतेचा बुरखा पांघरुन त्या आडून अभिषेक तरुण मुलीचं लैंगिक शोषण करत होता. तो फोटोग्राफ आणि व्हिडिओ काढून मुलींना, महिलांना ब्लॅकमेल करायचा. सर्वसामान्यांना त्याच्या अध्यात्मिक चेहऱ्यावर विश्वास बसावा म्हणून अभिषेक मिश्राने ‘अदीकरता नारायण दास’ असं नाव धारण केलं होतं. IIT रुरकीमधून त्याने मॅकेनिकल इंजिनिअरची डिग्री घेतली होती. छत्तीसगडमधील एका महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अभिषेक मिश्रा त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधायचा. आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर तो मुलींना त्यांच्या कुटुंबांशी संपर्क तोडायला लावायचा. नंतर त्यांचं शोषण करायचा. मथुरेतील त्याच्या घरी एकवेळ 24 तरुण मुलं आणि मुली एकत्र रहात होत्या. मुली-महिला त्याच्या प्रभावाखाली आल्यानंतर तो त्यांना गंर्धव विवाहाचा प्रस्ताव द्यायचा. लैंगिक शोषण करण्याची त्याची ही पद्धत होती. गंर्धव विवाह केल्यानंतर तो मुलींना प्रसादाच्या नावाखाली उत्तेजक मिसळलेलं दूध प्यायला द्यायचा. नंतर लैंगिक कृतीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ब्लॅकमेल करायचा.

सहकाऱ्यांनी मोठा गोंधळ घातला होता

त्याच्या मोबाइल फोनमध्ये अश्लील फोटो, व्हिडिओ सापडले आहेत. पोलिसांचा या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. अभिषेक मिश्रा त्याच्यासोबत राहणाऱ्यांच्या कुटुंबाकडून पैसे उकळायचा. दुसऱ्या मुली त्याच्या सहवासात, सन्नानिध्यात याव्यात यासाठी प्रयत्न करायचा. अटकेच्या सहामहिने आधी एका मुलीचं कुटुंब तिला नेण्यासाठी त्याच्या मथुरेतील घरी आलं होतं. त्यावेळी मिश्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोठा गोंधळ घातला होता.

आईला समजल्यानंतर ती निघून गेली

अभिषेक मिश्राची आई सुरुवातीला त्याच्यासोबत रहायची. पण मुलाची ही कृत्य समजल्यानंतर ती तिथून निघून गेली. आधी तो भाड्याच्या घरात रहायचा नंतर त्याने स्वत:च घर घेतलं. जे सुरुवातीला मिश्रा सोबत रहायला यायचे. त्यांना त्याच्या वागणुकीवर संशय आल्यानंतर ते निघून जायचे, असं पोलिसांनी सांगितलं. त्याच्यासोबत निष्ठावान रहावं म्हणून तो सोबत येणाऱ्याचं ब्रेनवॉश करायचा. त्याने किती महिलांना टार्गेट करुन त्यांचं शोषण केलं, याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in