• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आली रे आली… देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन ट्रेन आली, अवघ्या 5 रुपयांत करता येणार प्रवास; कसा असेल रूट?

July 16, 2026 by admin Leave a Comment


भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे. देशातील पहिली हरित हायड्रोजन ट्रेन सुरू होण्यासाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हरियाणातील जिंद येथून या ऐतिहासिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. स्वच्छ, हरित आणि शून्य-उत्सर्जन वाहतुकीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर हायड्रोजन ट्रेनचे फोटो पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी लिहिले, “भारताची पहिली हायड्रोजन-चालित ट्रेन हरियाणातून सुरू होणार आहे.” पंतप्रधान मोदींच्या पोस्टमुळे या प्रकल्पाबद्दल जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या “हायड्रोजन फॉर हेरिटेज” या उपक्रमाचा एक भाग आहे. या योजनेअंतर्गत, रेल्वे भविष्यात आणखी 35 हायड्रोजन ट्रेन्स सुरू करण्याची तयारी करत आहे, जेणेकरून वारसा आणि ग्रामीण मार्गांवर धावणाऱ्या जुन्या डिझेल इंजिनांना एक पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होईल.

ट्रेनची वैशिष्ट्ये
ही नवीन ट्रेन 10 डब्यांची हायड्रोजन-चालित डीईएमयू म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. यात 682 जागा असून एकूण 2,600 प्रवाशांची क्षमता आहे. चाचणीदरम्यान, ट्रेनने ही मर्यादा ओलांडली, परंतु नियमित संचालनासाठी तिचा कमाल वेग ताशी 75 किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे. हा अजूनही एक प्रायोगिक प्रकल्प असल्याने, त्याची अंमलबजावणी नियंत्रित आणि सावधगिरीने केली जात आहे. या ट्रेनचे भाडे हे 5 ते 25 रुपये इतके असणार आहे.s

माध्यमाच्या वृत्तानुसार, हायड्रोजन ट्रेन फिरत्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये कार्य करतात. हाटड्रोजन वायू आणि बाहेरील वातारणातील ऑक्सिजन एका इंधन सेलमध्ये एकत्र केले जातात. या रासायनिक प्रक्रियेतून वीज निर्माण होते, जी ट्रेनच्या इलेक्ट्रिक मोटर्सना उर्जा पुरवते. या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही हानिकारक धूर उत्सर्जित होत नाही, त्याऐवजी, केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता निर्माण होते.

तज्ञांच्या मते, या ट्रेनचा उद्देश रेल्वे नेटवर्कला कार्बनमुक्त करणे आहे, विशेषतः अशा मार्गांवर जिथे ओव्हरहेड पॉवर लाईन्स टाकणे अवघड किंवा अत्यंत महाग आहे. हायड्रोजन ट्रेन इलेक्ट्रिक ट्रेनसारखेच पर्यावरणीय फायदे देतात, परंतु त्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधांची आवश्यकता नसते आणि डिझेल ट्रेनप्रमाणेच काही मिनिटांतच त्यात इंधन भरून त्या धावू शकतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • iQOO ने भारतात लाँच केला 7050 mAh बॅटरी असलेला नवीन 5G फोन, जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता
  • रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं…
  • वरलक्ष्मी व्रताचा शुभ दिवस, धनप्राप्तीसाठी करा ‘हे’ 3 सोपे उपाय
  • जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
  • 4 कॅमेरे अन् 5000mAh बॅटरी; Samsung चा 5G फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या ऑफर किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in